Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बोगस बियाण्यांच्या (Bogus seeds) मुद्यावरून महायुती (Mahayuti) सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र बोगस बियाण्यांचा अड्डा झाला असून बोगस बियाण्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत, असा गंभीर वडेट्टीवार यांनी केला. यावेळी वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका केली आहे.
“हगवणे कुटुंबाकडून मलाही आमंत्रण मिळालं होतं पण मी..”, सुप्रिया सुळेंनी नेमकं काय सांगितलं?
महाराष्ट्र बोगस बियाण्यांचे केंद्र बनले आहे.
शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळत आहेत, आणि त्यामागे मंत्रालयापर्यंतचे धागेदोरे असल्याची शंका आहे. या गैरप्रकारांमुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर गेला आहे.अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पीक मोठ्या प्रमाणावर नुकसानात… pic.twitter.com/lIYqOrLSty
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 22, 2025
विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र बोगस बियाण्यांचा अड्डा झालाय. आळीमिळी चुपीगिळी… तुम्ही-आम्ही मिळून खाऊ, असा प्रकार राज्यात सुरू आहे. आम्ही हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. परवा आमची याबाबत बैठकही झाली. शेतकऱ्यांना शुद्ध वाण मिळत नाही. बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला. याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेत. सगळे मिळून राजरोसपणे हा प्रकार करत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावं. अन्यथा असाही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र पुढं गेला. पुन्हा त्याचा उच्चांक गाठू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.
पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवलं
वडेट्टीवार म्हणाले, बोगस बियाणे येत असतील तर गंभीर बाब आहे. त्यामुळं कायद्यात सुधारणा करून बोगस बियाणे विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर दहा वर्षांची शिक्षा करणारं बील आणावं, तसेच, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आणि फसवणाऱ्यांना माफ करता कामा नये, अशी भूमिका सरकारने स्वीकारावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत थातुरमातूर चर्चा झाली. परंतु, कोणताही ठोस निर्णय झाला नाही, अशी खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. तसेच अवकाळी पावसामुळं आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पण त्यावरही सरकारने कोणतेही भाष्य केले नाही. या प्रकरणी सरकार गंभीर असल्याचे दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
वैष्णवी हगवणे हे प्रकरण आत्महत्येचे नाही तर हत्येचे असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. ते म्हणाले की, मी वैष्णवी हगवणे प्रकरणाची माहिती घेतली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहावे लागेल. त्यांच्याच पक्षाचा तो व्यक्ती आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने हुंड्यासाठी आपल्या सुनेची हत्या करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. ही आत्महत्या नाही तर हुंड्यासाठी केलेली हत्या आहे, असं ते म्हणाले.