Download App

Maratha Reservation Bill : मराठा समाजाची सरकारकडून पुन्हा फसवणूक, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar On Maratha Reservation Bill : राज्यातील सरकार (state government)हे फसवं सरकार आहे. हे सरकार फसगत करणारं फसवं सरकार आहे. एकूणच आत्तापर्यंत अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण टिकलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी केला आहे.

Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सवाल

विरोधी पक्षनेते म्हणाले की, या मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देत असताना त्याला कोणताही ठोस आधार नाही. हा कायद्याच्या निकषामध्ये बसणारा नाही. आम्हाला या विधेयकाला समर्थन यासाठी द्यावं लागलं की, आम्ही विरोध केला असता तर आम्ही विरोध केला म्हणून बोंबाबोंब केली असती. त्यांना या निवडणुका मारुन न्यायच्या आहेत. त्यामुळेच हा खटाटोप केला असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Sonam Kapoor च्या फॅशनचा जगात डंका! फॅशनमधील प्रतिष्ठितांच्या यादीत टॉप 40 मध्ये मिळवलं स्थान

2019 मध्ये अशीच मराठा समाजाची मतं घेऊन निवडणूक काढून घेतली आणि नंतर समाजाची फसगत झाली हे सिद्ध झालं. अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम शिंदे सरकारनं केली आहे. त्यामुळे मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे काम केल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक पटलावर मांडले. त्यानंतर कोणत्याही चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात करण्यात आले.

50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण देण्याचा निर्णय हा राज्य सरकारला नाही. पण राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे की आम्हाला तो अधिकार आहे. निकषात बसणारं आरक्षण आम्ही दिलेलं आहे. दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुका मारुन नेण्यापुरतीची सोय आहे.

हे टिकणारं आरक्षण नाही. त्यावर आम्ही बोलायला उभे राहिलो तर त्यावर आम्हाला बोलूही दिलं नाही. आणि विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचं काम सरकारकडून केलं जात असल्याचाही गंभीर आरोप यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

follow us

वेब स्टोरीज