‘अजितदादा मैत्रीचा तर पक्का आहेच पण..,’ वडेट्टीवारांचा मिश्किल अंदाजात टोला

Vijay Wadettiwar : अजितदादा मैत्रीचा पक्का पण सत्तेचाही पक्का माणूस असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना वडेट्टीवार यांनी दादांना मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे. ‘भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून […]

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : अजितदादा मैत्रीचा पक्का पण सत्तेचाही पक्का माणूस असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना वडेट्टीवार यांनी दादांना मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे.

‘भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात आनंद’; वडेट्टीवारांचा घणाघात…

वडेट्टीवार म्हणाले, मला राजकारणात 25 वर्षे तर अजित पवार यांना 32 वर्षे झाली आहेत. आम्ही दोघेही मित्र आहोत. अजितदादा मैत्रीचा पक्का पण सत्तेचाही पक्का माणूस आहे. आमच्या दोघांची मैत्री अन् सत्ता अबाधित राहो, अशी प्रार्थना विजय वडेट्टीवारींनी केली आहे.

तसेच यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलच धारेवर धरलं आहे. ते म्हणाले, भाजप काल-परवा ज्यांना चोर म्हणत होते, आज त्याच चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात भाजपला परमोच्च आनंद मिळत आहे. तसेच आधी शिवसेना फोडली तेव्हा सत्तेत येण्याची शाश्वत नव्हती आता अजितदादांना सोबत घेतल्यानंतर दादांची ताकद वाढली की भाजपची? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

Dcm Ajit Pawar : ‘महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार’

महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे. राजकीय घडामोडींना महाराष्ट्रातील जनता विटली आहे. भाजपने मतांचा कुठलाही आदर केलेला नाही. याचं गोष्टीमुळे आगामी निवडणुकीत जनता बदला घेणार असल्याचा विश्वासही वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये असताना विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे राज्यात विरोधकांच्या राजकारणात दुफळी निर्माण झाल्याची परिस्थिती होती.

सत्तेत सामिल झाल्यानंतर अजित पवारांसह समर्थकांना मंत्रिपदेही देण्यात आली. अशातच आता महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेसकडे पाहिलं जात होतं. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ अधिक असल्याने अधिवेशनाच्या शेवटच्या विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा करण्यात आली होती.

Exit mobile version