‘भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात आनंद’; वडेट्टीवारांचा घणाघात…

‘भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात आनंद’; वडेट्टीवारांचा घणाघात…

भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात परमोच्च आनंद मिळत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजप काल-परवा ज्यांना चोर म्हणत होते, आज त्याच चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात भाजपला परमोच्च आनंद मिळत आहे. तसेच आधी शिवसेना फोडली तेव्हा सत्तेत येण्याची शाश्वत नव्हती आता अजितदादांना सोबत घेतल्यानंतर दादांची ताकद वाढली की भाजपची? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

Dcm Ajit Pawar : ‘महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार’

महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे. राजकीय घडामोडींना महाराष्ट्रातील जनता विटली आहे. भाजपने मतांचा कुठलाही आदर केलेला नाही. याचं गोष्टीमुळे आगामी निवडणुकीत जनता बदला घेणार असल्याचा विश्वासही वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भाजपला आगामी निवडणुकीत स्वबळावर निवडून येण्याची शाश्वती नसल्यानेच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गट फोडला आहे. आता भाजपला पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांची गरज भासली आहे. पुरोगामी नेत्यांची गरज भासणं हा भाजपचा पराजय असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. तसेच आगामी निवडणुकीत फुटीर लोकांचा बदला जनता घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube