Download App

महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हाण देणारी हीच का भाजपची संस्कृती?, वडेट्टावारांचा थेट सवाल

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar on Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नुकतेच एका सभेत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हाण देणारी भाषा वापरली होती. त्यानंतर राणे समोर उभ्या असलेल्या पोलिसांकडे बघून म्हणाले की, पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करू द्या. पोलिस माझा व्हिडिओ स्वत:च्या पत्नीला दाखवतील, पण कुणी माझं वाकडं करू शकणार नाही. आमच्या राज्यात आम्हाला काय करू शकणार? जागेवर राहायचं ना, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या या भाषणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवा (Vijay Wadettiwar) यांना आक्षेप घेत टीका केली.

Nitesh Rane : ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपवासी होणार? तुमचा-आमचा बॉस लवकरच एकच; राणेंचं सूचक वक्तव्य 

वडेट्टीवार यांनी नितेश राणेंच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा… पोलिस माझे व्हिडिओ स्वत:च्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकडं करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी आणि राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली होती का? महिलांचा अपमान करून पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी गॅंरंटी? असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला.

Nitesh Rane : ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपवासी होणार? तुमचा-आमचा बॉस लवकरच एकच; राणेंचं सूचक वक्तव्य 

तर आता वडेट्टीवार यांच्या ट्विटला उत्तर देताना राणेंनी लिहिलं की, कोणी केला महिलांचा अपमान? हिंदू भगिनींना लव्ह जिहादच्या नावावर फसवले जाते, तेव्हा तुम्ही कधी बोलतांना दिस नाही… विरोधक पक्ष नेता हा फक्त एका धर्माच्या बाजूने बोलणारा नसतो… हे लक्षात असून दे… MVA च्या काळात पोलिसांकडून वसुली करतांना तुमच्या सरकारला पोलिसांची काळजी वाटली नाही का? असो.. आपण ओरिजनल हिंदुत्ववादी आहात… आणि आमचे जुने सहकारी पण…. काय माहित तुमचा आणि आणचा बॉस लवकरच एक असेल…. म्हणून, इथेच थांबतो, असं राणे म्हणाले.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! आता शरद पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपमध्ये प्रवेश करणार? 

 

ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केलं. अशातच आता भाजप आमदार नितेश राणेंनी मोठं विधान केलं. त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या ट्विटला रिप्लाय करत लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल, असं सूचक विधान केलं. त्यामुळं राणेंच्या वक्तव्याला आता वटेट्टीवार नेमंक काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us