Download App

CM फडणवीसांनी नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, विजय वडेट्टीवारांकडून कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं.

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) वारसदार व्हावे, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं. चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एका कार्यक्रमात बोलतांना वडेट्टीवार यांनी हे विधान केलं. वडेट्टीवार यांनी फडणवीसांचा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) पुढील वारसदार म्हणून केलेल्या उल्लेखामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मोठी बातमी! सावरकर प्रकरणातील मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना जामीन 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्रपूरचे ज्येष्ठ नेते मारोतराव कन्नमवार यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय वडेट्टीवार होते. या कार्यक्रमात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एका माजी मुख्यमंत्र्यांच्या 125 व्या जयंतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेत, ही मोठी गोष्ट आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी ते आले आहेत, हा मोठेपणा असतो. खरं तर, त्यावेळी आम्ही यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्याकडे पाहायचो आणि नंतर ते मुख्यमंत्री देखील झाले. आता तुमच्याकडे कर्तुत्व आहे, कार्य करण्याची क्षमता आणि हिंमत आहे. त्यामुळं आता तुम्ही सुध्दा नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे. हे स्वाभाविक आहे. यात काहीही वेगळे नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

पुन्हा राजकीय भूकंप! शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होणार, शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा… 

पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, किशोर जोरगेवार यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी जो प्रस्ताव मांडला, त्याला मी अनुमोदन देतो. खरंतर, तुम्ही बाजूची खुर्ची घेण्यात फार पटाईत आहात. राजकारणात हे कौशल्य, काही गोष्टी ज्यूनियरकडून सिनियरला शिकावे लागते. ते मी किशोर जोरगेवार यांच्याकडून येथे आल्यापासून शिकलो, अशी फटकेबाजी वडेट्टीवार यांनी केली.

पुढं वडेट्टीवार म्हणाले की, मारोतकार कन्नमवारजी राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री बनले. त्यांनी विकासाची पायाभरणी केली. या विकासाचे कळस म्हणून देवेंद्रजी काम करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर दोन्ही जिल्हे दत्तक घ्यावेत, असं वडेट्टीवार म्हणाले.

चंद्रपूर हा वाघ आणि ‘वारां’चा जिल्हा -फडणवीस
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मला माहिती आहे की चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा आणि ‘वारांचा’ आहे. सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत, तसेच विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार हे देखील आमचे मित्र आहेत. त्यामुळे मी सांगतो की, कुठलेही ‘वार’ असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत. त्यामुळं ‘वार’ हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात नेहमी पुढे असतात, असं विधान फडणवीस यांनी केलं.

 

follow us