LokSabha Election Kirit Somaiya tweet : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपला मुंबईत दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. ईशान्य मुंबई मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजपचे (BJP) मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे. या पराभवानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक वादग्रस्त ट्टीट केले आहे. आमचा उमेदवार बांगलादेशी परिसरात हरला आहे. परंतु हे ट्वीट सोमय्या यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची तक्रार ठाकरे गटाचे पुणे शहराप्रमुख संजय मोरे व इतरांनी याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.
नाशिकमध्ये राडा! आमदार किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवार दराडेंना मारहाण
तसेच याबाबत भारत निवडणूक आयोग, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. भाजप मिहीर कोटेचा ईशान्य मुंबई 29,861 मताने पराभूत. मानखुर्दमध्ये 87, 971 मतांची तूट. मुलुंड ते घाटकोपर 58,110 मतांचा लीड. मानखुर्द विधानसभा (बांगलादेश परिसर) उद्धव ठाकरे सेना 1,16,072 मते, तर भाजपला 28,101 मते. आम्ही बांगलादेशी परिसरात हरलो, पराभूत झालो, असे वादग्रस्त ट्वीट सोमय्या यांनी केले आहे.
या विधानाचा अर्थ असा होत आहे की मुंबई शहरातील हा भाग मुंबईचा नसून बांगलादेशचा आहे. असे त्यांनी त्यांच्या विधानामधे स्पष्ट उल्लेख केला आहे. हे विधान देशाच्या अखंडतेला तडा देणारे आहे. देशाच्या अखंडतेवर बोलणे व त्यावर शंकास्पद विधान करणे हे देशद्रोह करण्यासारखे आहे. भारत देश हा अखंड आहे. मुंबईच काय तर देशातील कोणत्याही राज्याचा भाग हा शेजारील राष्ट्राचा होऊ शकत नाही. असे विधान करणे म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास करण्यासारखे, असे तक्रारीत म्हटले आहे.
एटीएस अथवा एनआयएचा मार्फत चौकशी करा
त्या भागाला जर ते बंगलादेशी परिसर म्हणत असतील तर त्यांच्याकडे असे कोणते पुरावे आहेत. ज्यामुळे ते हे सिद्ध करू शकतात ? याचीही चाचणी ATS अथवा NIA च्या मार्फत करणे क्रमप्राप्त आहे. कारण सदर व्यक्ती ही देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या विधानाची पडताळणी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांनी केलेल्या विधानाची त्यांच्याकडे चौकशी करण्यात यावी. तसेच मानखुर्द हा भाग महाराष्ट्रातील मुंबई या शहरातील आहे. त्याबद्दल असे विधान करणे हे त्या भागातील दलित व अल्पसंख्याक लोकांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे सदरचा गुन्हा हा ॲट्रॉसिटी अंतर्गत येत असल्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मतदान करणारे लोक हे बांगलादेशी परिसरातील आहे असे मत मांडणे म्हणजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारे आहे. यात कोणतीही शंका उपस्थित होत नाही. त्यामुळे सदरची तक्रार आपल्या मार्फत निवडणूक आयोगाला करण्यात यावी, अशी विनंती करीत आहोत.
सोमय्यांचा बंदोबस्त करा
या व्यक्तीने देशांमधील दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्यासाठी व विशिष्ट जातीच्या लोकांना व धर्माच्या लोकांना कमी लेखण्याच्या हेतूनेच सदरचे विधान केले आहे. किरीट सोमय्या यांना ताब्यात घेऊन पुढील फौजदारी कारवाई करून व देशाच्या संविधानातील अखंडतेचे व समतेचे रक्षण कराल, याची आम्हाला खात्री आहे. अन्यथा शिवसेना पुणे शहराच्या वतीने देशांमध्ये अखंडता व समतेवर घाला घालणाऱ्या नेत्यांचा बंदोबस्त शिवसेना पुणे शहराच्या वतीने करण्यात येईल, असा इशाराही तक्रारीत करण्यात आलाय.