Sharad Pawar : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. या भेटीदरम्यान शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या दीड तासापेक्षा जास्त चर्चा झाल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप येणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते मात्र ही भेट फक्त आरक्षणाच्या मुद्यावर होती अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. तर या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, मला त्या दिवशी ताप होता, मी दोन दिवस सुट्टी घेतली होती. मला सांगितलं भुजबळ साहेब एक तासापासून आले आहे. जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर त्यांनी मला काही गोष्टी सांगितले. या गोष्टी केलं तर राज्याचं हित आहे असे ते म्हणाले होते.
शिंदेंनी जरांगे आणि हाके यांच्याशी काय चर्चा केली
मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी काय चर्चा केली हे आम्हाला माहिती नाही. त्यासोबतच त्यांनी जरांगेंना काय आश्वासन दिले आणि ओबीसी आंदोलकांना काय आश्वासन दिले याचा वास्तव समोर येत नाही तो पर्यंत आम्ही बैठकीत जाणार नाही अशी आमची भूमिका होती. तसेच शिंदेंनी जरांगे आणि हाके यांच्याशी काय चर्चा केली हे मला माहित नाही. सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी असं शरद पवार म्हणाले.
राज्यात शांततेची गरज
सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिलं हे मला माहिती नाही. मात्र, आज राज्यात शांततेची गरज आहे याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. ती शांतता निर्माण व्हायलाचं पाहिजे या मताचा मी आहे. तसंच, जरांगे यांच्यासोबत जर सरकारने संवाद साधला असेल तर त्यामध्ये विरोधकांचं काय काम असा प्रतिप्रश्न उपस्थित करत पवारांनी सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीवरून केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं आहे. तसंच, अगोदर विरोधकांना बाजूला ठेवलं आणि आता विचारतायेत असा टोलाही पवारांनी लगावला आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात 24 जणांचा प्रवेश