फडणवीसांची ऑफर कधी स्विकारणार? सत्यजित तांबेंनी दिले उत्तर..

अहमदनगर : कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या सिटीझनविल या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसकडून तरुण नेत्यांकडे दुर्लक्ष होतं. आणि सत्यजित तांबे यांच्यावर आमचं लक्ष आहे, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याबद्दल कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांना ‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात विचारले असता. त्यांनी यावर आपली भूमिका […]

Tambe 1024x569

Tambe 1024x569

अहमदनगर : कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या सिटीझनविल या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसकडून तरुण नेत्यांकडे दुर्लक्ष होतं. आणि सत्यजित तांबे यांच्यावर आमचं लक्ष आहे, असं वक्तव्य केलं होतं.

यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याबद्दल कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांना ‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात विचारले असता. त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

‘गेल्या 20-22 वर्षापासून मी कॉंग्रेसमध्ये काम करतो आहे. माझं हे काम देवेंद्र फडणवीसांनी पाहिले असावं. राजकारणात काम करीत असताना एकमेकांच्या पक्षातील नेत्यांकडे लक्ष ठेवले जातं. आमचं देखील भाजपमधील चांगलं काम करणाऱ्या नेत्यांकडे लक्ष असतं.

अमुक-अमुक नेता कॉंग्रेसमध्ये असता तर चांगलं झालं असतं, असं वाटतं. कदाचित अशीच भावना फडणवीसांची त्या विधानामागे असावी’, अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबे दिली. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.

’27 सप्टेंबर 2000 पासून मी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून कॉग्रेसमध्ये काम केलंय. पक्षात वेगवेगळ्या पदावर काम केलंय. 10 वर्षे जिल्हा परिषद सदस्य होतो. एकदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती.

एवढं सगळं काम केल्यानंतर सत्यजीतला काहीतरी मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, अशी भावना माझ्या आजूबाजूच्या लोकांची आहे, असे सत्यजित तांबे म्हणाले. या प्रश्नासह विविध मुद्द्यांवर सत्यजित तांबे यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

Exit mobile version