Sanjay Raut : कोण एकनाथ शिंदे, त्यांची लायकी काय? असा सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच भडकल्याचं दिसून आले आहेत. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल नूकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत भडकले आहेत.
निकालाची स्क्रिप्ट वरून आली, आजचा निकाल ठाकरेंच्या विरोधात लागणार; वडेट्टीवारांचा दावा
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र गद्दारांना क्षमा करणार नाही. रामाचं नाव घेण्याचा शिंदे गटाला अधिकार नाही पित्याच्या शब्दासाठी राम वनवासात गेले आणि तुम्ही शिवसेनेला गुलाम करुन वनवासात पाठवण्याच काम केलं तुम्हाला पिढी माफ करणार नाही. टेक्निकल मुद्द्यावर शिवसेना बनलेली नाही…कोण एकनाथ शिंदे? कोण भरत गोगावले? त्यांची लायकी काय असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंची लायकीच काढली आहे.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण
तसेच कोण विधासभा अध्यक्ष? ते ठरवणार का 40 आमदार निघून गेले तर पक्ष त्यांचा झाला का? बहुमत कोणाला हे पाहण्याचा अधिकार त्यांना आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला अधिकार देण्याचा अधिकार नाही. बेकायदेशीर अध्यक्षांनी हा निर्णय दिला आहे, तेच बेकायदेशीर असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
Sanjay Raut : ‘अपात्रतेआधीच मॅच फिक्स, निर्णय दिल्लीत झालाय’; राऊतांच्या आरोपाने खळबळ!
राहुल नार्वेकरच बेकायदेशीर आहेत. त्यांचा निकालही बेकायदेशीर असून आजचा निकाल नाहीतर षडयंत्र आहे पण आम्ही विधानसभा अध्यक्ष किती खोटे वागले हे कोर्टात सिद्ध करु. गुजरात लॉबीचा शिवसेना संपवण्याचं षडयंत्र आहे, दोन चार लोकं दिल्लीत बसून हे शिवसेना संपवण्याचं ठरवू शकत नाही पण आमचा जीव गेला तरीही लढणार, तुम्ही बंदुका घेऊन या आम्ही लढण्यासाठी तयार असल्याचं खुलं आव्हानच संजय राऊतांनी यावेळी दिलं आहे.
दरम्यान, मागील 8 ते 10 महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला. अवघ्या राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. दरम्यान, आता निकाल समोर असून नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरवलेत. तसंच शिवसेना (Shivsena) ही मुख्यमंत्री एकनाथ शिदेंचीच आहे, यावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान, या निर्णयामुळ ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.