who is Praful lodha : राज्यात नाशिकचे हनीट्रॅप प्रकरण (honey-trap) चांगलंच गाजतंय. नाशिकमधील एका एका हॉटेलमधून हे हनी ट्रॅप प्रकरण सुरू होतं. त्यात आजी-माजी मंत्री, मोठे अधिकारी असे तब्बल 72 जण अडकल्याचे बोलले जातंय. परंतु पोलिस दरबारी तक्रार देण्यास कुणी धजावत नाही. कारण बदनामी होऊन आयुष्य उद्धवस्त होईल ही भिती. त्यात हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांनी सापळा रचणाऱ्यांना कोट्यवधी रुपये बिनबोभाट दिलेले. विरोधकांच्या हाती आयते कोलित नकोय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हनी ट्रॅपच नसल्याचा सभागृहात सांगून टाकलं. ना हनी आहे ना ट्रॅप, असे मुख्यमंत्री फडणवीसांचे बोल होते. विशेष म्हणजे अधिवेशन सुरू असताना भाजपमध्ये असलेल्या प्रफुल्ल लोढाला (who is Praful lodha ) मुंबई पोलिसांनी अत्याचार केलेल्या गुन्ह्यात अटक केलेली असते. अधिवेशन संपल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाला गती आलीय. अनेक नेत्यांशी राजकीय संबंध असलेला प्रफुल्ल लोढा कोण आहे. हेच आपण पाहुया…
दारू पिणे टाळा हे सांगण्याऐवजी मनपा आयुक्तांचा गणेशभक्तांना अजब सल्ला, म्हणाले, ‘आपण कमी दारू…’
मुंबईतील दोन गुन्ह्यात प्रफुल्ल लोढाला अटक
प्रफुल्ल लोढाविरुद्ध मुंबईत दोन गुन्हे नोंदविले गेलेत. लोढाच्या मुंबईतील चकाला परिसरातील चकाला हाऊस नावाच्या बंगल्यामध्ये नोकरीचा अमिष दाखवून 16 वर्षीय मुली, तिच्या मैत्रिणींवर अत्याचार केले. त्यानंतर अश्लिल छात्राचित्र काढून घरात डांबून ठेवल्याचा एक गुन्हा 3 जुलै रोजी साकीनाका येथील पोलिस ठाण्यात दाखल होतो. दोनच दिवसात लोढाला पोलिस अटक करतात. 14 जुलै रोजी अंधरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात लोढाविरुद्ध एक गुन्हा दाखल होतो. तो असतो पोस्को, बलात्कार खंडणीसह हनी ट्रॅपचा गुन्हा. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी या गुन्ह्याचे चौकशी थेट नाशिक, जळगावला जावून केली होती. त्यात लोढाच्या घरातून लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलंय. या लॅपटॉपमध्ये जर हनी ट्रॅपचे पुरावे मिळाले तर राज्यात मोठा धमाका होईल.
महसूल अधिकाऱ्याला दहा कोटी मागितले पण…
प्रफुल्ल लोढाचे वेगवेगळे कारनामे हळूहळू बाहेर येतायत. महसूल विभागातील एका आयएएस अधिकाऱ्याला खास सेवा देण्याची नावाखाली हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते. एका महिलेने व लोढाने या अधिकाऱ्याकडे थेट तीन कोटी रुपये मागितले. त्या अधिकाऱ्याने बदनामीच्या भितीने पैसे देऊन टाकले. त्यानंतर पुन्हा दहा कोटींची मागणी झाली होती. परंतु तो अधिकारी पोलिसांकडे गेल्याचे बोलले जाते. परंतु संबंधित महिला आणि अधिकाऱ्यांमध्ये सेटलमेंट होते आणि हे प्रकरण मिटल्याचे बोलले जातंय. एका लग्नाच्या प्रकरणानंतर प्रफुल्ल लोढा व एका महिलेने जामनेरचे माजी नगराध्यक्षाला तब्बल 25 लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी घेताना लासलगावमध्ये महिलेला अटक झाली. त्यात प्रफुल्ल लोढाविरुद्ध लासलगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
धक्कादायक : छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बालकांना अचानक लुळेपणा, नक्की काय घडलं?
गिरीश महाजनांना उघड धमकी देणारा प्रफुल्ल लोढा कोण?
लोढा हा मूळचा जामनेर तालुक्यातील कहूरपेठचा आहे. त्याची गावात वडिलोपार्जित शेती, प्लॉट आहे. तो एका सिनेमा थिएटरचा मालक आहे. तर तो ठेकेदार म्हणून व्यवसायात राहिला आहे. सध्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे व प्रफुल्ल लोढाचे वीस वर्षांपासून जवळचे संबंध आहेत. बरं हे संबंध गिरीश महाजन हे गावाचे सरपंच असल्यापासूनचे आहेत. लोढा हे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यसेवक म्हणून वागत होते. तर गिरीश महाजनांबरोबर राहुल प्रफुल्ल लोढांनाही राजकारण उडी घेतली. 1995 मध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली. परंतु यश आले नाही. गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा हे महाजनांकडे मोठी कामे मागू लागले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे तेथील स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहेत. त्यानंतर प्रफुल्ल लोढा हा राष्ट्रवादीत गेला.आपल्याकडे एक बटण दाबले तर सगळं काही उघड होईल, असा दावा लोढा केला होता. तेव्हा त्याने महाजनांचे नाव घेतले नव्हते.
लोकसभेला माघार ते भाजप प्रवेश
2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असल्याचा दावा करत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, पाच दिवसात माघार घेत देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत तो भाजपवासी झाला. परंतु त्याला भाजपमध्ये कोणतेही पद देण्यात आलेले नाही. कधी एकनाथ खडसेंविरुद्ध तर कधी महाजनांवर बोलणारा प्रफुल्ल लोढा स्वतःच हनी ट्रॅपमध्ये अडकलाय. लोढा महाजनांचा माणूस असल्याने खडसेही आता मैदानात उतरलेत. भाजपचे संकटमोटक असणारे महाजनांवर लोढामुळे संकट आलाय हे नक्की.