दारू पिणे टाळा हे सांगण्याऐवजी मनपा आयुक्तांचा गणेशभक्तांना अजब सल्ला, म्हणाले, ‘आपण कमी दारू…’

दारू पिणे टाळा हे सांगण्याऐवजी मनपा आयुक्तांचा गणेशभक्तांना अजब सल्ला, म्हणाले, ‘आपण कमी दारू…’

Naval Kishor Ram : दारूबंदीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे की, आपण दारू कमी पिऊ, असं विधान पुण्याचे मनपा आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishor Ram)यांनी केलं. एका बैठकीत आयुक्तांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना हा अजब सल्ला दिला.

धक्कादायक : छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बालकांना अचानक लुळेपणा, नक्की काय घडलं? 

यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून पासून सुरू होत असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने तयारीला सुरुवात केली. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आणि पोलिस यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, दारूबंदी लागू करणे हा प्रशासकीय आणि कायदेशीर मुद्दा आहे, परंतु दारूबंदी पेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे की, आपण दारू कमी पिऊ, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात ? सुनील तटकरेंचे संकेत 

पुढं बोलताना आयुक्त म्हणाले की, मद्यपान करून काहीजम गणेशोत्सवात सहभागी होतात. बऱ्याचदा महिलांसोबतही गैरप्रकार घडतात. यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. पण मला वाटतं, जोपर्यंत स्वत: समाज जागृत होत नाही, तोपर्यंत पोलिस प्रशासनाने कितीही काळजी घेतली तरी यावर नियंत्रण येणार नाही. त्यामुळं दारूबंदी पेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे की, आपण दारू कमी पिऊ. दारूबंदीच्या बाबतीत काय करताय येईल याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे. गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि उत्सव सुरक्षित व शांततेत साजरा होण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून जबाबदारीने वागणे गरजेचे आहे, असं आयुक्त म्हणाले.

दारूच्या नशेमुळे गणेशोत्सवात अनुचित घटना घडू नयेत, यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस समन्वयाने काम करणार आहे. तसेच गस्त वाढवण्यावरही भर असणार आहे, असं आयुक्त म्हणाले.

दरम्यान, आपण कमी दारू पिऊ, या वक्तव्याबाबत मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता ‘मी गमतीने म्हटलो’ असा खुलासा त्यांनी केला केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube