मागील काही दिवसापासून अजित पवार (ajit pawar) आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यातील वाद पुन्हा समोर येत आहे. आज पुण्यात यांची पुन्हा प्रचिती आली. पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक उत्तर दिल. प्रश्नांला उत्तर देताना अजितदादांनी ‘कोण संजय राऊत’ असा उलट प्रश्न पत्रकारांना केला.
पुण्यात पुणे जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती सांगण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांना देखील उत्तर दिली. त्यावेळी संजय राऊत यांच्यावर बोलताना ते पुढे म्हणाले की, मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. कुणी अंगाला का लावून घ्यावं,मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो.”
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा कडक शब्दांत टीका केली होती.
अजितदादांच्या त्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तरही दिले होते. संजय राऊत म्हणाले की, गेली 45 वर्ष झाली मी पत्रकारीतेत आहे. त्यामुळे मला माहिती आहे काय लिहियाचे? काय कोट करायचे? शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे अशा सगळ्या नेत्यांना मी कोट करतो. मी बरोबर बोललो, बरोबर लिहिले आहे. मी कधीही माझ्या विधानापासून माघार घेतली नाही. मी काय चुकीचे बोललो ते त्यांच्या पक्षाकडून कोणीतरी येऊन सांगावं. अजितदादांनी सिध्द करावं मी काय चुकीचे बोललो. पवारसाहेबांशी यावर चर्चा करावी, असे अवाहन संजय राऊत यांनी अजित पवार यांना केले.
Ajit Pawar : कोणाच्या सोईने हा कार्यक्रम करण्यात आला, याची चौकशी करा अन्यथा…
त्यावर आज पुन्हा पुण्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बंडाच्या चर्चा काहीशा थंडावल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिउत्तरावर प्रश्न विचारले असता ते म्हणाले, ‘कोण संजय राऊत? मी कोणाचं नाव घेतले नाही, कोणाच्या अंगाला का लागावं. मी माझा पक्षा आणि आमच्या पुरतं बोललेलो होतो.’ असा टोला यावेळी अजित पवारांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे.