Download App

Gaurav Bapat : कसब्याचा लीड कुणाचा? गौरव बापटांचा भाजप नेत्यांना तिखट सवाल..

Gaurav Bapat : नुकतंच लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) पार पडले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातून

  • Written By: Last Updated:

Gaurav Bapat : नुकतंच लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) पार पडले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा पराभव केला . मात्र त्यानंतर काही भाजप नेत्यांकडून पुण्यात आमच्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना (Muralidhar Mohol) लीड मिळाला असे बॅनर लावण्यात येत आहे. मात्र यावर गिरीश बापट (Girish Bapat) यांचे सुपुत्र गौरव बापट (Gaurav Bapat) यांनी नाराजी व्यक्त करत फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी पुणे शहरातील सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला आणि मुरलीधर मोहोळ खासदार झाले असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणुका पार पडल्या. पुणे शहरातील सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. मुरलीधर मोहोळ खासदार झाले. अगदी लाखाच्या पुढे मताधिक्य मिळाले. परंतु या विजयात कोणी एकच वाटेकरी आहे आणि माझ्यामुळेच कसे मताधिक्य मिळाले हे सांगण्याची जी अहमहमिका पुणे शहरातील काही भाजप नेते आणि काही व्यक्तीमध्ये सुरू आहे ते बघून वाईट वाटते. या निवडणुकीत अनेक घटकांनी सहभाग घेतला.

पंतप्रधान मोदीजी यांच्यावर मतदारांनी दाखवलेला विश्वास हा लोकसभा विजयातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, पतीत पावन संघटनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक, राष्ट्रवादी चे सर्व कार्यकर्ते, रिपाई आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते, लोकजनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटना या सर्वांचा वाटा या विजयात आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला. ही व्यक्ती आपले प्रतिनिधित्त्व संसदेमध्ये करण्यास सक्षम आहे हा तो विश्वास होता.

देवेंद्र फडणवीस साहेबांनी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी, चंद्रकांत दादांनी सर्वांना मार्गदर्शन केले. शहर अध्यक्षांचा सहभाग होता. नेता कोण जो पराभवाची जबाबदारी घेतो, विजयाचे श्रेय कार्यकर्त्याला देतो. पुणे शहरातील लोकसभेचा विजय हा भारतीय जनता पक्षाचा विजय आहे. मोदींच्या सक्षम नेतृत्वाचा विजय आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या लोकप्रियतेचा विजय आहे. अमुक मतदारसंघात माझ्यामुळे मताधिक्य मिळाले हे सांगणे, त्याची सर्वत्र जाहिरात करणे, बॅनर लावणे हे हास्यास्पद आहे.

स्व. वसंतराव भागवतांचे, स्व. रामभाऊ म्हाळगी यांचे ( ज्यांच्या नावाच्या प्रबोधिनीत आम्ही कार्यकर्ते शिक्षण घेतो). स्व. गिरीश बापटांचे हे संस्कार नाहीत. कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. मूळ आहे. स्वतःच्या नावाची टिमकी वाजवून आपण त्या कार्यकर्त्याला अपमानित करतो आहोत, आपल्याच पायावर कुऱ्हाड मारतो आहोत.

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध

अधिक स्पष्टवक्तेपणा हा राजकारणात घातक असतो असे स्व. गिरीश बापट मला सांगायचे. पण कधी कधी इलाज नसतो. असं त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज