धंगेकरांचा कॉंग्रेस नेत्यांवर विश्वास नाही, त्यामुळेच बापटांचा फोटो वापरण्याची वेळ; गौरव बापटांचे टीकास्त्र

धंगेकरांचा कॉंग्रेस नेत्यांवर विश्वास नाही, त्यामुळेच बापटांचा फोटो वापरण्याची वेळ; गौरव बापटांचे टीकास्त्र

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) तर महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेक यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरला. जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा अशा आशयाचा मजकूर टाकून तो फोटो प्रसारित केला. यावर दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट (Gaurav Bapat) यांनी तीव्र आक्षेप घेतला.

सिमी संघटनेवर पाच वर्षासाठी बंदी, केंद्र सरकारनंतर आता राज्य शासनाचाही आदेश 

काल रात्री उशिरा काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, धंगेकर यांनी आपल्या पोस्टवर बापट यांचा ठेवला. त्याविषयी बोलतांना गौरव बापट म्हणाले, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर व नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याची वेळ आलेली आहे. यावरून त्यांच्या पराभवाची मानसिकता दिसून येते. जर स्वतःच्या पक्षावर, स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर आणि नेत्यांवर विश्वास असता तर अशा पद्धतीचे बालिश चाळे धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी व धंगेकरांनी केलेच नसते, असा आरोप गौरव बापट यांनी केला.

Shirdi Loksabha : शिर्डीत ‘भाऊसाहेब’ विरुद्ध ‘भाऊसाहेब’ सामना रंगणार? 

दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यातील ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत संपूर्ण बापट कुटुंब भाजपसोबत असून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आपण मैदानात उतरणार असल्याचेही गौरव बापट यांनी सांगितले.

ते म्हणाले, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असंही गौरव बापट म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube