Shirdi Loksabha : शिर्डीत ‘भाऊसाहेब’ विरुद्ध ‘भाऊसाहेब’ सामना रंगणार?
प्रविण सुरवसे
Shirdi Loksabha : लोकसभेचे बिगुल वाजलंयं. (Loksabha Election) राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरुयं. अहमदनगर दक्षिणमध्ये लोकसभेचे (Ahmednagar Loksabha) उमेदवार निश्चित झालेत मात्र, अद्याप शिर्डीतून (Shirdi Loksabha) महाविकास आघाडी असो वा महायुती दोघांचेही उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिर्डी मतदारसंघातून ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जातेयं. तर दुसरीकडे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबाबत असलेली नाराजी यामुळे शिवसेना इथं दुसरा उमेदवार देणार अशी चर्चा सुरुयं. यातच ठाकरे गटात असलेले भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने लोकसभेसाठी त्यांची दावेदारी प्रबळ मानली जातेयं.. असं झालं तर शिर्डी मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchoure) विरुद्ध भाऊसाहेब कांबळे अशी लढत होईल. दरम्यान येत्या काळात कोणते भाऊसाहेब शिर्डीमध्ये वरचढ ठरणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा! आप कार्यकर्त्यांचं आंदोलन, आतिशी यांच्यासह 2 मंत्री ताब्यात
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नगर दक्षिणेमध्ये भाजपकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. यामुळे नगर दक्षिणेमध्ये विखे विरुद्ध लंके असा सामाना पाहायला मिळणार. दक्षिणेचे गणित सुटली असली तरी मात्र शिर्डीमध्ये अद्याप महाविकास आघाडी असो वा महायुती या दोन्ही गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डीतून सेनेच्या दोन्ही गटाकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु आहे.
‘…तर आमचाही शिवसेना उमेदवारांना विरोध’; अजितदादांच्या आमदाराने बोलून दाखवलं
भाऊसाहेब कांबळे नेमके आहेत तरी कोण?
उद्धव ठाकरेंसोबत असलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झाले आहे. मात्र त्यापूर्वी 2009 आणि 2014 साली कांबळे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत श्रीरामपूरचे आमदार राहिले. २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने भाऊसाहेब कांबळेंना शिर्डी लोकसभेत उतरविले होते. तेव्हा कांबळे श्रीरामपूरचे आमदार होते. मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते असतानाही कांबळे पराभूत झाले. तेव्हा सदाशिव लोखंडे दुसऱ्यांदा खासदार झाले. त्यानंतर लगेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे हे शिवसेनेकडून लढले. पण काँग्रेसच्या लहू कानडेंकडून त्यांचा पराभव झाला.
कांबळेच्या प्रवेशामागे विखेंची खेळी :
भाऊसाहेब कांबळे हे गेली अनेक वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये काम केले आहे. काँग्रेसमधून त्यांनी दोन टर्म आमदारकी भूषवली आहे. दरम्यान तत्कालीन काँग्रेसमध्ये असलेले व सध्या भाजपात असलेले राधाकृष्ण विखे यांचे ते निकटवर्तीय देखील समजले जातात. यातच गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांची विखे यांच्याविरोधात असलेल्या भूमिकेने व वक्तव्याने विखे हे लोखंडे यांच्यावर नाराज आहे अशी चर्चा आहे. लोखंडे यांच्याविरोधात मतदार संघात नाराजी असल्याचा फायदा घेत विखेंनी कांबळेंसाठी डाव टाकल्याचे बोलले जात आहे. कांबळे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने लोखंडे यांची लोकसभेची वाट कठीण होण्याची शक्यता आहे.
जरा या म्हटल्यावर शेपूट हलवत जातात, राज ठाकरे-अमित शाह भेटीवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शिर्डीच्या जागेचा पेच कायम :
शिर्डीमध्ये अद्याप ठाकरे गटाने उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही मात्र याठिकाणाहून भाऊसाहेब वाकचौरे लढतील असे बोलले जात आहे. दरम्यान माविआमधून शिर्डीच्या जागेसाठी काँग्रेस देखील आग्रही आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून भाजप देखील या जागेसाठी इच्छुक आहे. यातच मनसेचे इंजिन महायुतीला जोडले गेले तर महायुतीकडून हि जागा मनसेला देखील सोडली जाऊ शकते. तर रामदास आठवलेंनीही शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे दिवसागणिक शिर्डी लोकसभेच्या जागेची चर्चा जोर धरत असून नेमकी जागा कुणाला मिळणार? आणि उमेदवार कोण असणार? याची उत्कंठा लागलेली आहे.