Sharad Pawar : कारवाईचा फायदा केजरीवालांनाच, भाजपच्या ‘त्या’ दोन जागाही येणार नाही; पवारांचा घणाघात

Sharad Pawar : कारवाईचा फायदा केजरीवालांनाच, भाजपच्या ‘त्या’ दोन जागाही येणार नाही; पवारांचा घणाघात

Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राज्यात शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, या कारवाईचा केजरीवाल यांनाच फायदा होईल. त्यांच्या शंभर टक्के जागा निवडून येतील. गेल्यावेळी दिल्लीत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. या कारवाईनंतर भाजपच्या त्या दोन जागा सुद्धा निवडून येणार नाही. असं पवार म्हणाले.

श्रेयस तळपदे आणि तुषार कपूरच्या ‘कपकपी’ या आगामी थ्रिलर सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपकडून केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. यामध्ये पहिलं उदाहरण म्हणजे काँग्रेसच अकाउंट गोठवण्यात आलं. तसेच राज्यांतील प्रमुख नेत्यांवर ईडी कारवाई केली जात आहे. त्यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्र्यांवर पहिल्यांदा कारवाई झाली. ते आदिवासी आहेत. त्यांचा लोकांवर प्रभाव आहे. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंना धक्का! माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिंदे गटात; शिर्डीत नवा डाव

त्यानंतर आता अरविंद केजरीवाल, आम्हाला वाटत होतं की त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल. त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने ठरवलेल्या मद्य धोरणावर ही कारवाई करण्यात आली. मात्र यासाठी मुख्यमंत्र्यांना अटक करण्याऐवजी कोर्टामध्ये जाणे किंवा निवडणुकांच्या माध्यमातून जनतेसमोर जाणे हा पर्याय असतो. मात्र या कारवाईचा केजरीवाल यांनाच फायदा होणार आहे. त्यांच्या शंभर टक्के जागा निवडून येतील.

गेल्यावेळी देखील अशाच प्रकारे केजरीवालांचा प्रचंड बहुमताने विजय झाला होता. तर भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. तर आता केजरीवालांना अटक केल्यानंतर भाजपच्या दोन जागा सुद्धा निवडून येणार नाहीत. जनता केजरीवालांच्या बाजूने कौल देईल. तर ज्यांनी या कारवाया केल्या. त्यांच्या थोबाडीत देतील. त्यामुळे भाजपचा हा मुख्यमंत्र्यांना अटक करणं यंत्रणांचा गैरवापर करणे निवडणुकांच्या काळामध्ये दहशत निर्माण करण्यात या सर्व गोष्टींचा मी तीव्र निषेध करतो. असं म्हणत केजरीवालांच्या अटकेवर पवारांनी संताप व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube