मी नकली असेल, तर तुम्ही बेअकली! पंतप्रधानांच्या टीकेवर ठाकरेंचा प्रहार
Uddhav Thackeray criticized PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी हे अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंवर वयक्तिक हमला कत आहेत. तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना सॅम पित्रोदांच्या विधानावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंना थेट ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ अशी टीका केली. (Narendra Modi ) या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते महाविकास आघाडीचे शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
माझी नकली सेना तर तुमच्यासोबत गद्दार अन् गाढवांची टोळी; मोदींना ठाकरेंनी सुनावलं!
माझ्या आईचा अपमान
‘काल तेलंगणात पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. या सभेत त्यांनी माझ्यावर टीका केली. कारण त्यांना सगळीकडे केवळ उद्धव ठाकरेच दिसत आहेत. काल तेलंगणाच्या सभेत बोलताना त्यांनी माझा उल्लेख ‘बाळासाहेबांचा नकली पूत्र’ असा केला. मोदीजी मी नकली असेल तर तुम्ही ‘बेअकली’ आहात अशा शब्दांत ठाकरे यांनी मोदींवर घणाघात केला. तसंच, हा माझा अपमान नाही. हा माझ्या वडिलांचा म्हणजेच बाळासाहेबांचा आणि माझ्या आईचा अपमान आहे असंही ठाकरे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर मोदींवर कदाचित आईवडीलांचे संस्कार झाले नसतील. पण माझ्यावर झाले आहेत. मी सुसंस्कृत घरातला आहे अशा शब्दांत ठाकरेंनी मोदींचा समाचार घेतला.
मी तुम्हाला शिकवणी लावतो
‘तुम्ही नोटबंदीच्या वेळी तुमच्या आईला रांगेत उभं केलं होतं. 90 वर्षांच्या माऊलीचा वापर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केला असा आरोप करत इतका मी निर्देयी नाही असंही ठाकरे म्हणाले. ‘मातृदेव भव:’ आणि पितृदेव भव:’ हे माणणारं आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका, बाळासाहेब म्हणायच्या आधी हिंदुहृदयसम्राट म्हणायला शिका. नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो. तुम्हाला हिंदुहृदयसम्राट म्हणायला जमत नसेल तर ते महाराष्ट्राची जनता तुम्हाल शिकवेल’, असंही ते म्हणाले.
नकली शिवसेना काँग्रेससोबत मिळून हिंदुत्त्व विरोधी काम करते, मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
केराच्या टोपलीत टाकलं असतं
‘पंतप्रधान मोदी आज मला आणि माझ्या शिवसेना नकली म्हणत आहेत. मात्र, या ठाकरे घराण्याने या महाराष्ट्राची सेवा केली आहे. 2014 आणि 2019 मध्ये आम्ही भाजपाबरोबर होतो. त्यावेळी त्यांनी आमच्या पाठीत वार केले. त्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली, तर ते आम्हाला नकली म्हणत आहेत. बाळासाहेबांच्या पुत्राला नकली म्हणत आहात. जर 2001 मध्ये बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं नसतं तर अटलबिहारी वाजपेयींनी त्यांना केराच्या टोपलीत टाकलं असतं असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.