दोन्ही आजी-माजी उमेदवार गद्दार, त्यांना प्रेशर कुकरचे चटके बसायला लागले; उत्कर्षा रुपवतेंचे टीकास्त्र

दोन्ही आजी-माजी उमेदवार गद्दार, त्यांना प्रेशर कुकरचे चटके बसायला लागले; उत्कर्षा रुपवतेंचे टीकास्त्र

Utkarsha Rupwate Shirdi Speech : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करत आहे. आता शिर्डी लोकसभेच्या वंचित बुहजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी सदाभाऊ लोखंडे (Sadabhau Lokhande) आणि भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांच्यावर घणाघाती टीका केली. दोन्ही आजी-माजी उमेदवार गद्दार आहेत, आता प्रेशर कुकरचे चटके आता त्यांना बसायला लागले, अशी टीका त्यांनी केली.

‘कांद्याचा वांदा’ : निर्यातबंदी हटवल्यानंतरही पाकिस्तान पळवणार भारताचे ग्राहक देश 

उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ आज प्रकाश आंबेडकरांची शिर्डीत सभा घेतली. या सभेत बोलतांना उत्कर्ष रुपवते म्हणाले, मला वंचितकडून उमदेवारीही जाहीर झाली नव्हती, मी पक्षप्रवेशही केला नव्हता. त्यावेळी मी फक्त राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. त्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची हवाच बदलली. आता आपल्याला प्रेशर कुकर ही निशाणी मिळाली. आता या प्रेशर कुकरचे प्रेशर आणि त्याचे चटके हे समोरच्यांना बसायला लागले, अशी टीका रुपवतेंनी केली.

महाराष्ट्र हादरला! दुसऱ्या जातीच्या मुलासबोत प्रेम प्रकरण असल्याने आई – वडिलांकडून मुलीची हत्या 

रुपवते म्हणाल्या, शिर्डीत निवडणुकीचे वारे वाहायला लागले, तेव्हापासून दोन आजी-माजी गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत होते. आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागत होतो, पण आजी-माजी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असं समजून फिरत होते. पण ते कधीच त्यांच्या प्रचारात शेतकरी, आदिवासी, महिला, मागासवर्गीय प्रश्नांवर बोलले नाहीत. आमच्या प्रश्नावर तुम्ही कधी बोलणार हे त्यांना ठणकाऊन विचारलं पाहिजे. आम्ही फक्त सभा मंडपं बांधली एवढचं ते सांगू शकतात. ते दोन्ही उमेदवार गद्दार आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे ओरीजनल गद्दार आहे. सर्वात आधी गद्दारी करणारे ते आहेत, अशी टीका रुपवतेंनी केली.

एसआयटी लावण्याच पाप सरकारने केलं
संघर्षयोद्धा मनोज जरागेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभारला, त्याला प्रथम पाठिंबा प्रकाश आंबेडकरांनी दिला. आरक्षणासाठी बसलेल्या निरापराध आंदोलकांवर सरकारने लाठीचार्च केला. आपले लढे चिरडण्याचं काम सरकार करते. न्यायाधीश लोहियांचं खून झाला, त्याच्या चौकशीसाठी एसआयटी लावली नाही. पण, आरक्षणसाठी लढणाऱ्यांवर एसआयटी लावल्याचं काम पाप या सरकारने गेली, असा हल्लाबोल रुपवतेंनी केला.

यावेळी बोलतांना रुपवतेंनी शिवसेनेवरही टीका केली. आरक्षणसााठी मुकमोर्चे निघाले, तेव्हा सामनाच्या अग्रलेखात मुका मोर्चा म्हणत मराठा आंदोलनाची अवहेलना केली, अशी टीकाही रुपवतेंनी केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज