Shirdi Loksabha : भाऊसाहेब वाकचौरेंच्या घरवापसीने शिर्डीचा आणखी ‘तिढा’

  • Written By: Published:
Shirdi Loksabha : भाऊसाहेब वाकचौरेंच्या घरवापसीने शिर्डीचा आणखी ‘तिढा’

Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वाकचौरे हे ठाकरे गटाकडून या मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसकडूनही या जागेवर दावेदारी सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही (Ramdas Athawale) या जागेवर दावा सांगू लागले आहेत. त्याची धडकी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना भरली आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभेचे राजकीय समीकरणे बदलले आहेत. या बदलत्या समीकरणामुळे मात्र महाविकास आघाडी, महायुतीसाठी ही जागा कशी डोकेदुखी ठरणार हे जाणून घेऊया…

शिर्डी लोकसभेच्या तिकीटावरून विखेंचे थेट दिल्लीकडे बोट, आठवलेंचे काय होणार?

2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. या मतदारसंघात तीन वेळा काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीतील बडे नेते असले मतदारसंघात तीनही वेळेस शिवसेनेच्या तिकीटावर खासदार निवडून आला. राखीव झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले हे पराभूत झाले. मात्र 2014 साली शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत थेट काँग्रेससची वाट धरली. हा प्रवेश करण्यामागे त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे होते.

अजितदादा आमचे नेते आहेत असं म्हणालोच नाही; पवारांचं काही तासातचं घुमजाव

तेव्हा शिवसेनेला उमेदवार शोधण्यासाठी मोठी धावपळ झाली. नाशिकमधील शिवसेनेचे नेते, माजी बबनराव घोलप यांना शिवसेनेकडून शिर्डीत उतरविण्याचा निर्णय झाला. परंतु एका प्रकरणात बबनराव घोलप यांना तीन वर्ष शिक्षा झाल्याने ते निवडणुकीसाठी अपात्र ठरले. घोलपांना ए व बी फॉर्मही मिळाला होता. त्यांचा मुलगा योगेश घोलपनेही अर्ज दाखल केला. वडिलांना दिलेला ए व बी फॉर्म योगेश यांनी वापरत पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे.

परंतु शिवसेनेने सदाशिव लोखंडे हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणीत लोखंडे हे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात प्रचार करत लोखंडेंनी वाकचौरे यांचा पराभव केला.

या पराभवानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपची वाट धरली. 2014 साली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर ते पराभूत झाले. त्यानंतर 2019 ची लोकसभा वाकचौरे अपक्ष लढले. परंतु त्यांना डिपॉझिट वाचविता आले नाही. त्यामुळे आता पुन्हा 2024 ला रिंगणात उतरण्यासाठी ते पुन्हा स्वगृही परतले. त्यांचा प्रवेशाचा सोहळा पाहता तेच शिर्डीचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे.

ही जागा गेली तीन टर्म काँग्रेसकडे होती. येथून काँग्रेसकडून आंबेडकरी चळवळीतील नेते प्रेमानंद दादासाहेब रुपवते यांची मुलगी उत्कर्षा या तिकीट मागत आहेत. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे उत्कर्षा रुपवते यांना तिकीट देण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या जागेवरून ठाकरे गट व काँग्रेसमध्ये चूरस निर्माण झाली आहे.

दुसरीकडे महायुतीमध्ये तिच परिस्थिती आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाकडे आहे. ते दोन टर्म खासदार आहेत. त्यामुळे ते दावेदार आहेत. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून रामदास आठवले या जागेवर दावा सांगू लागले आहेत. आठवलेंनी शिर्डीचे दौरे वाढविले आहेत. मेळावे घेतले जात आहेत. त्यामुळे आठवलेंची तयारीही सदाशिव लोखंडे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. परंतु आता ही जागा कुणाला सोडायची यावर भाजप व शिंदे गटात तिढा निर्माण होईल.

लोखंडे बीएआरएस नेत्यांना का भेटले ?

एेनवेळी पत्ता कट झाल्यास अडचण होऊ नये म्हणून लोखंडे दुसरीकडे चाचपणी करू लागले आहेत. मध्यंतरी ते श्रीरामपूरमध्ये बीआरएसच्या नेत्यांना भेटले होते. परंतु अद्याप तरी बीआरएसमध्ये जाण्याचे पत्ते लोखंडे यांनी ओपन केलेले नाहीत. तर बहुजन वंचित आघाडी येथून उमेदवार देतात. यामुळे हा मतदारसंघात तिकीट वाटपापासून तिढा निर्माण झाला आहे. तर महाआघाडी, महायुतीमधील पक्षातील वरिष्ठांसाठी हा मतदारसंघ डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यामुळे निवडणुकीत या मतदारसंघातील राजकीय गणिते कशी असतील हे भविष्यात समोर येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube