वंचित भाजपची नाही, तर बाबासाहेबांची ‘बी टीम’; उत्कर्षा रुपवतेंनी मविआला ठणकावलं

वंचित भाजपची नाही, तर बाबासाहेबांची ‘बी टीम’; उत्कर्षा रुपवतेंनी मविआला ठणकावलं

Utkarsha Rupwate On MVA : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi)जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुक लढण्याचं ठरवलं आणि अनेक मतदारसंघात वंचितचे उमेदवार जाहीर केले. त्यावर वंचितवर भाजपची (BJP) बी टीम असल्याचा आरोप होतोय. त्या आरोपांना आता उत्कर्षा रुपवतेंनी (Utkarsha Rupwate) जोरदार प्रत्युत्तर दिलं.

‘कांद्याचा वांदा’ : निर्यातबंदी हटवल्यानंतरही पाकिस्तान पळवणार भारताचे ग्राहक देश 

उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ आज प्रकाश आंबेडकरांची शिर्डीत सभा घेतली. या सभेत बोलतांना उत्कर्ष रुपवते म्हणाले, महाविकास आघाडीकडून वंतितवर भाजपची बी टीम असा आरोप होतोय. मात्र, सात ते आठ ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला. संविधान रक्षणाच्या लढाईसाठी वंचित आघाडीवर आहोत. भाजपसोबत जाणारी शिवसेना तुम्हाला बी टीम वाटत नाही, पण वंचित बी टीम वाटते. आम्ही बाबासाहेब आंबडेकरांना आणि त्यांचे नातू प्रकाश आंबेडकरांना मानतो.. आम्ही भाजपची नाही, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची बी टीम आहोत, असं रुपवतेंनी ठणकावलं.

महाराष्ट्र हादरला! दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याने आई – वडिलांकडून मुलीची हत्या 

मला वंचितकडून उमदेवारीही जाहीर झाली नव्हती, मी पक्षप्रवेशही केला नव्हता. त्यावेळी मी फक्त राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. त्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची हवाच बदलली. आता आपल्या प्रेशर कुकरचे प्रेशर आणि त्याचे चटके हे समोरच्यांना बसायला लागले, अशी टीका रुपवतेंनी विरोधकांवर केला.

कुस्तीगीर महिलांवर ज्यांनी अन्याय केला त्यांना अभय…
या सरकारकडून उद्योगपतींचे कर्ज माफ केल्या जातं, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही… सरकार चार हजार रुपये देत आहे, पण याचा अर्थ सरकार उपकार करतेय, असं नाही. कुस्तीगीर महिलांवर ज्यांनी अन्याय केला, त्यांना अभय देण्याचं काम या सरकारने केलं. दोन कोटी रोजगार देऊ असं आश्वासन देऊनही मोदी सरकारने आश्वानस पूर्ण केलं नाही, महिला, शेतकरी, आदिवासी यांच्या उन्नतीसाठी भाजपने काहीच केलं नाही, अशी टीका रुपवतेंनी केली.

आजी माजी उमेदवार प्रचारात शेतकरी, आदिवासी, महिला, मागासवर्गीय प्रश्नांवर बोलले नाहीत. आमच्या प्रश्नावर तुम्ही कधी बोलणार हे त्यांना ठणकाऊन विचारलं पाहिजे. आम्ही फक्त सभा मंडपं बांधली एवढचं ते सांगू शकतात, अशा शब्दात त्यांनी लोखंडे आणि वाकचौरे यांच्यावर टीका केली.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
मोदींच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व नाकारले आहे. या 17 लाख कुटुंबाची मालमत्ता 50 कोटी रुपये होती. राज्यसभेच्या रेकॉर्डवर चा गोष्टी आलेल्या आहेत. या लोकांनी नागरित्व सोडण्याचं कारण म्हणजे, यांना मागितलेला हप्ता, असा आरोपही आंबेडकरांनी केला. बाजारातला एखादा दादा दुकानंदारांकडून वसुली करतो, तशाच रितीने मोदींनी ईडी, सीबीआयचा वापर करत वसुली केली. पीएम कार्यालय वसुली कार्यालय झालं, असं आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज