‘देवा भाऊ सुपरफास्ट’ तर ‘शिंदे सुपर स्लो’ का? सचिन सावंतांचा फडणवीसांना सवाल…

‘देवा भाऊ सुपरफास्ट’ तर ‘शिंदे सुपर स्लो’ का? असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे. दरम्यान, भाजपकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. या जाहिरातीवर बोट ठेवत सचिन सावंतांनी सवाल केला आहे. तसेच जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्टमध्ये नसल्याने शिंदे कुठे गेले? असाही सवाल सावंतांकडून आला आहे. याआधीही चुकीच्या जाहिरातीवरुन सचिन सावंतांनी […]

Sachin Sawant

Sachin Sawant

‘देवा भाऊ सुपरफास्ट’ तर ‘शिंदे सुपर स्लो’ का? असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे. दरम्यान, भाजपकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. या जाहिरातीवर बोट ठेवत सचिन सावंतांनी सवाल केला आहे. तसेच जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्टमध्ये नसल्याने शिंदे कुठे गेले? असाही सवाल सावंतांकडून आला आहे. याआधीही चुकीच्या जाहिरातीवरुन सचिन सावंतांनी हल्लाबोल केला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती.त्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून जनतेने पसंती दिल्याचा सर्वे प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर शिंदेंनी पुन्हा जाहिरातीतील चूक सुधारुन दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केली होती. आता फडणवीसांनीही जाहिरात छापून एकनाथ शिंदे यांना डावलल्याने बदला घेतला की काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका-टीपण्यांचे सत्र सुरु आहे. भाजपकडून ‘देवा भाऊ सुपरफास्ट’ अशा मजकूराची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. त्यावरुन देवा भाऊ सुपरफास्ट? शिंदे कुठे गेले? ते सुपर स्लो का? असा सवाल करीत पिक्चर इधर अभी बाकी है मेरे दोस्त… या शब्दांत सचिन सावंत यांनी भाजपला डिवचलं आहे.

Baipan Bhari Deva Review: बाईच्या मनातला मनमोकळा संवाद…बाईपण जगण्याची धमाल गोष्ट

भाजपच्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रात 40 हजार कोटींच्या विविध गुंतवणुकीला मान्यता मिळाल्याने आता 1 लाख 20 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलंय. एवढंच नाहीतर जे प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत त्याचीही माहिती देण्यात आलीय, तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचा फोटो प्रसिद्ध करुन ‘देवा भाऊ सुपरफास्ट’ असा मजकूर लिहिण्यात आलायं.

रिक्षावर ‘नाव’ पाहून पवार भारावले; कार्यकर्ताही म्हणाला ‘आषाढीच्या दिवशी विठ्ठल भेटला’

याआधीही चुकीच्या जाहिरातीवरुन सचिन सावंत यांनी ट्विट करत खोचक ट्वीट केलं आहे. त्यावेळी ट्विटमध्ये त्यांनी जाहिरातीच्या बॅनरवर सीआयडीचं सिरिअलचे एक मीम लावत मालिकेतील कलाकार शिवाजी साटम यांचा त्यांच्या सहकलाकारांसमवेत फोटो लावून ‘दया कुछ तो गडबड है’ हा प्रसिद्ध डायलॉगदेखील कॅप्शनमध्ये देत हल्लाबोल केला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केल्याचं दिसून येत आहे. जाहिरातीबाजीवरुन सारवासारव करीत असतानाच आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी ‘देवा भाऊ सुपरफास्ट’ अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा विरोधकांकडून धारेवर धरण्यात येत आहे.

Exit mobile version