प्रफुल्ल साळंखे
विशेष प्रतिनिधी
Dhananjay Munde News : पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं असल्याचं म्हणत कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीतल्या गोटातली अंदर की बात सांगितली आहे. दरम्यान, कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच मंथन शिबीर सुरु आहे. या वैचारिक मंथन शिबीरा दरम्यान धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर रोख असल्याचं पाहायला मिळालं.
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीच्या मलेशिया दौऱ्यानंतर ‘यूके टूर’ नं वाढवली चाहत्यांची उत्सुकता
धनंजय मुंडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्हा सर्वांची एकाच व्यक्तीमुळे अनेकांची कोंडी झाली होती. आम्ही पक्ष का सोडला, यापेक्षा आम्हाला पक्ष का सोडावा लागला. याचेही विचार होणे गरजेचं आहे, असं सांगत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंब्र्यातील बेकायदा शाखेची पुर्नबांधणीच अनधिकृत, सरकारी वरदहस्ताने…; जितेंद्र आव्हाडांचा आरोप
पक्षात ज्या पद्धतीने कामकाज सुरु होते. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. गणेश नाईक, निरंजन डावखरे यांनी पक्ष का सोडला? याचं उत्तर सर्वांना माहिती आहे. आर. आर. पाटील आज आपल्यात नाहीत पण सांगलीत त्यांना कसा त्रास झाला? हे सर्वांना माहिती आहे. हे सांगतांना मुंडे यांचा रोख हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेच असल्याचं दिसून आलं.
Sara Tendulkar: सारा तेंडुलकर पास झाली! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स
अजितदादांनी काय केलं हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. मी 2014 मध्ये पराभूत होऊनही मला अजितदादांनी विधान परिषदेत विरोधी पक्षाची जबाबदारी मला दिली. याची आठवणही मुंडे यांनी करुन दिली आहे. राज्यात दुष्काळ, शेतकरी , अवकळी पाऊस या मुद्द्यावर जयंत पाटील यांचा दौरा सुरु आहे. जयंत पाटील यांची जळगावात शेतकऱ्यांसाठी रॅली आहे. या रॅलीवरुनही धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांना टार्गेट केलं आहे.
Uttarkashi Tunnel : “आम्ही फक्त क्रिकेटमध्येच नाही तर…” ऑस्ट्रेलियाच्या PM ना अर्नोल्ड डिस्कचे उत्तर
दरम्यान, या वैचारिक मंथन शिबीरात अजित पवार गटाचे सर्वच नेते उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, यांच्यासह राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते या शिबिरास उपस्थित आहेत.