‘बीडमधील हिंसाचाराची ‘एसआयटी’ चौकशी करा’; धनंजय मुंडे घेणार CM शिंदेंची भेट

‘बीडमधील हिंसाचाराची ‘एसआयटी’ चौकशी करा’; धनंजय मुंडे घेणार CM शिंदेंची भेट

Dhananjay Munde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान बीड शहरासह (Beed News) जिल्ह्यात अनेक हिंसक घटना घडल्या. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या.  या सगळ्या घटनांमागे मोठं षडयंत्र आहे. बीडमधील हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली.  मंत्री मुंडे आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. येथे त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची माहिती घेतली. तसेच आमदारांच्या घरी जाऊन पाहणीही केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या हिंसाचाराच्या घटनांचा जाहीर निषेध केला.

Maratha Reservation : आंदोलनाचा भडका! बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही संचारबंदी

बीड जिल्ह्यातच नाही तर राज्याच्या इतिहासातही अशा पद्धतीच्या घटना कधी घडल्या नाहीत. निमित्त मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात होतं. एका फोनवरच्या अर्थाचा अनर्थ काढून सगळा बीड जिल्हा पेटवण्याचा जो प्रयत्न समाजकंटकांनी केला असा प्रकार याआधी कधीच झाला नाही. इतका भयानक प्रकार या बीड जिल्ह्यात झाला. माजलगावची घटनाही दुर्दैवीच आहे. आरक्षणाची अनेक आंदोलनं या देशाने पाहिली. पण, अशा आरक्षणाच्या आंदोलनातून कुणाच्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन ते पूर्ण उद्धवस्त करण्याचं काम कधीच कोणत्या आरक्षणाची मागणी करणाऱ्यांकडून झालेलं नाही. पण, बीड जिल्ह्यात त्या दिवशी लोकप्रतिनिधींची घरं जाळण्यापासून व्यवसायाची ठिकाणं जाळण्यापासून जे काही प्रकार घडले त्याचा मी जाहीर निषेध करतो.

हिंसाचारामागे मोठं षडयंत्र

बीड, माजलगाव किंवा जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या घटना असतील त्या जर पाहिल्या तर यामागे मोठं षडयंत्र असल्याचं दिसून येत आहे. ज्या प्रकारे एका ऑडिओ क्लिपच्या अर्थाचा अनर्थ करून संपूर्ण समाजात वितुष्ट निर्माण करण्याचं काम केलं. तिथून माजलगावला काही होईल हे पोलिसांनी माहिती होण्याआधीच आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ आणि त्यांना जीवे मारण्यापर्यंत प्रयत्न झाला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.  बीडमध्ये सुद्धा ठराविक ठिकाणी एक एक व्यक्ती त्याचं घर त्याचा व्यवसाय. तो कोणत्या समाजाचा आहे हे पाहून याठिकाणी हल्ले केले गेले. या पाठीमागे फार मोठे षडयंत्र आहे. आतापर्यंत पोलिसांनी जी काही कारवाई करायची ती केली आहे. बीड आणि माजलगावच्या घटनांत काही लोक आयडेंटीफाय झाले आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

Maratha Reservation : बीडमध्ये आमदारांचं निवासस्थान पेटवलं; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube