Download App

Rohit Pawar On Ajit Pawar : हाच का तुमचा स्वाभिमान?, अजित पवारांवर रोहित पवारांचा घणाघात

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Rohit Pawar On Ajit Pawar : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) जाहीर सभा घेतली होती. या सभेत अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका करत 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रोहित पवार यांच्यासाठी कोण तिकीटची मागणी करत होते हे सांगितले. आता अजित पवार यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत हाच का तुमचा स्वाभिमान? असा प्रश्न विचारला आहे.

अजित पवार यांनी आज बारामती मतदारसंघात झालेल्या सभेत म्हटले होते की, 2017 मध्ये राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी रोहित पवार यांच्यासाठी माझ्याकडे जिल्हा परिषदेसाठी तिकीट मागितले होते, मी त्यांची ही मागणी साहेबांना कळवली. मात्र तेव्हा साहेबांनी स्पष्ट शब्दात नकार देत राजकारणात कोणी यायचे नाही, आपला बारामती अग्रो सांभाळा असं म्हणाले होते. मात्र राजेंद्र पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित अपक्ष फॉर्म भरणार असल्याचे मला सांगितले. त्यावेळी पक्षाचा एबी फॉर्म माझ्याकडे असल्याने मी तो साहेबांना न सांगता रोहितला दिला होता.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीत रोहितने मला खडकवासला येथून उमेदवारी द्या असे सांगितले. मात्र कर्जत- जामखेड मतदारसंघात माझे काम चांगले असल्याने मी त्याला कर्जत- जामखेडसाठी प्रयत्न कर म्हणालो. त्यापूर्वी हडपसरमधून देखील रोहितने तिकीट मागितले होते, माझे सासरे तिथे असल्याने मला मदत होईल असे तो म्हणाला होता आणि आता हीच मंडळी साहेबांच्या जवळ बसून माझ्यावर टीका करत आहेत, असा शब्दात अजित पवारांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. याच बरोबर जर सगळं काही साहेबांनी केलं, मग गेल्या 30-35 वर्षात आम्ही काय केलं? असा सवाल विचारात अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या मागील टीकेला उत्तर दिला होता.

पवारांचा विरोध असताना रोहित पवार आमदार कसे झाले? अजित पवारांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

तर आता अजित पवार यांच्या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर देत X वर लिहिले आहे की, अजितदादा तुम्हाला राजकारणात ज्यांनी सेट केलं, सगळं काही दिलं त्या आदरणीय पवार साहेबांना सोडल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यासाठी तुम्ही चिटर, खंडणीखोर, धमकी देणारा आणि जेलवारी करुन आलेल्या गुंड ‘अ’मंगलदास बांदल याची मदत घेता आणि स्वतः मात्र मान खाली घालून शांत बसता. हाच का तुमचा स्वाभिमान? साहेबांवर टीका करण्यासाठी भाडोत्री लोकांचा वापर करण्याचं तुमचं हे राजकारण कुणालाच पटणारं नाही. तुमच्यात झालेला हा बदल समजण्यापलीकडचा आहे. अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

follow us

वेब स्टोरीज