संभाजीराजे का संतापले संजय राऊतांवर? जाणून घ्या प्रकरण

मुंबई : महाविकासआघाडीने शनिवारी काढलेल्या मोर्चावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचा उल्लेख नॅनो मोर्चा असा केला. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आता याच व्हिडीओवरून संभाजीराजे संजय राऊतांवर संतापले आहे. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट केलाय. संबंधित व्हिडीओ हा […]

Sanjay Raut On Sambhaji Raje Chhatrapati

Sanjay Raut On Sambhaji Raje Chhatrapati

मुंबई : महाविकासआघाडीने शनिवारी काढलेल्या मोर्चावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचा उल्लेख नॅनो मोर्चा असा केला. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आता याच व्हिडीओवरून संभाजीराजे संजय राऊतांवर संतापले आहे.

संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट केलाय. संबंधित व्हिडीओ हा महाविकास आघाडीचा नुकतेच मुंबईत निघालेल्या महामोर्चाचा असल्याचा दावा त्यांनी केला. पण संबंधित व्हिडीओ हा 2017 साली मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा आहे, अशी माहिती समोर आलीय.

या कारणामुळे या व्हिडीओवरुन माजी खासदार संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. “ज्या मुका मोर्चाला हिणवले आणि तोच मोर्चा स्वत:च्या राजकारणासाठी वापरत आहात”, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर आपला संताप व्यक्त केला आहे.

या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा”, अशा शब्दांत संभाजीराजेंनी संजय राऊत यांचे कान टोचले आहेत.

दरम्यान, संजय राऊतांनी मराठा मोर्चाच्या गर्दीचा व्हिडिओ ट्विट केला, त्याची ‘चौकशी करणार’ असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावरुन राऊत यांनी ट्विट करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. जरूर चौकशी करा… मराठा मोर्चा ही सुद्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे.

महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती…करा चौकशी! आपल्या चोर कंपनीला क्लीन चिट देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत!”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Exit mobile version