Download App

निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार? पवारांनी अखेर सांगूनच टाकलं…

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम आजही कायम राहिला. लंके हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आज लंके यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची घेतली. यावेळी बोलतांना लंके यांनी आपण साहेबांच्या विचारांसोबत आहोत, असं स्पष्ट केलं. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. आणि लंके कोणत्या गटात आहेत? हेही स्पष्ट झालं नाही.

निलेश लंकेंना मदत लागल्यास आम्ही तयार; शरद पवारांचा लंकेंना शब्द 

लंके यांनी शरद पवार, जयंत पाटील यांची भेट घेतल्यावर या तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना लंके म्हणाले की, मला माझी 2019 ची विधानसभा निवडणुक आठवते. माझ्या तेव्हाच्या प्रचाराची सुरुवात शरद पवारांनी केली होती. मी शरद पवारांना कधीच सोडले नाही. माझ्या कार्यालयात त्यांचा फोटो आहे. शरद पवार आमच्या हृदयात आहेत. आमच्यात खासदारकी किंवा कोणत्याही निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा केली नाही, असं लंके म्हणाले होते.

निलेश लंके नेमक्या कोणत्या गटात? पवारांच्या डोक्यात प्लॅन काय? 

लंके पारनेरमध्येच राहणार
दरम्यान, निलेश लंके हे नगर दक्षिणमधून महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार असतील का, असा प्रश्न शरद याचा अंदाज यावा, यासाठी शऱद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला. लंके हे मुंबईत राहितील का दिल्लीत राहतील, असा प्रश्न पवारांना विचारताच पवार एका झटक्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. पवार म्हणाले, निलेश लंके पारनेरमध्येच राहणार आहेत. तिथं दुष्काळ पडलेला असताना मुंबईत त्यांचं मुंबईत काय काम आहे, असं उत्तर देत पवारांनी उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवला.

यावेळी बोलतांना पवारांनी लंके यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, 2019 मध्ये, आम्ही निलेश लंकेंना पारनेरमधून उमेदवारी दिली. निवडून आल्यानंतर लंकेंनी अखंडपणे जनतेची सेवा केली. त्यांची सेवा अत्यंत प्रामाणिक होती. त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा कायम आहे. मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. ते पक्ष कार्यालयात आले आहेत. आम्ही लंकेंकडे कष्ट करणारे लोकप्रतिनिधी म्हणून पाहतो, असं पवार म्हणाले

follow us

वेब स्टोरीज