Sanjay Raut on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) निकालावर अवलंबून आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र ठरले तर भाजप राष्ट्रवादीसोबत जाईल आणि अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरले तर उरलेले आमदार पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे येऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. यावर संजय राऊत यांनी थेट उत्तर दिले.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार आणि आमदार पुन्हा माघारी परतले तर त्यांना घेणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला गेला. यावर राऊत म्हणाले की एकनाथ शिंदेंसह गेलेले आमदार परत येणार असतील तर मी विरोध करेन, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
Sharad Pawar Resignation : पवारांनी भाकरीऐवजी तवाच का फिरवला? जयंत पाटलांनी सांगितलं कारण…
संजय राऊत पुढं म्हणाले की 40 आमदार आणि 13 खासदार शिवसेनेतून ज्या पद्धतीने ते सोडून गेले आहेत, पक्षाची बदनामी केली आहे. सर्व काही मिळून देखील ते गेले आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं आहे ती बेईमानी आहे, असे संजय राऊत यांनी सुनावले.
पक्ष सोडण्याला माझा विरोध नाही. मतभेद होतात त्यावेळी लोक पक्ष सोडून जातात. वेगळा पक्ष स्थापन करतात. पण शिवसेनाच आमची तुम्ही कोण? चिन्ह आमचं तुम्ही कोण? ही बेईमानी आहे. त्याला माझा विरोध आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.