Sharad Pawar Resignation : पवारांनी भाकरीऐवजी तवाच का फिरवला? जयंत पाटलांनी सांगितलं कारण…

Sharad Pawar Resignation : पवारांनी भाकरीऐवजी तवाच का फिरवला? जयंत पाटलांनी सांगितलं कारण…

Sharad Pawar Resignation : शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचं बोलले होते, पण त्यांनी तवाच फिरवला असल्याचं थेट वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राज्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या घडामोडींवर खुलेआम भाष्य केलंय.

खबरदार! मॅच फिक्सिंग कराल तर होईल पोस्टमॉर्टम ; Nana Patole यांचा इशारा कुणाला ?

जयंत पाटील म्हणाले, नव्या पिढीला पुढे आणण्यासाठी शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसमधून अनेक बडे नेते राष्ट्रवादीत आले. आज राष्ट्रवादीत नव्या पिढीचे असंख्य कार्यकर्ते आहेत. तरुणांची मोठी फळी निर्माण झाली आहे. शरद पवारांनी कायमच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना संधी देण्याचं काम केलं केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आजही नव्या तरुणांना राजकारणात पुढे आणण्यासाठीच पवार यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष ? ; पाहा, कुणाच्या नावाला मिळाली सर्वाधिक पसंती

तसेच देशात शरद पवारांसारख मोठं नेतृत्व दुसरं कोणी नाही. शरद पवार यांनी अनेक नेत्यांना संधी देऊन मोठं केलंय. राज्याला शरद पवारांचं नेतृत्व मान्य असून त्यांच्यामुळेच आज पक्षात कार्यकर्ते टिकून असल्याचं विधान जयंत पाटलांनी केलं आहे. शरद पवारांशिवाय कोणीही कार्यकर्त्यांना न्याय देणार नाही. शरद पवार अध्यक्ष नाहीत ही कल्पना कोणाला सहन होणार नाही.

पुणे महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका; तब्बल 2300 जणांवर कारवाईचे आदेश

आज राज्यात असंख्य कार्यकर्ते पवारांनी जोडले आहेत. देशाची माहिती ठेवणारा एकच नेता शरद पवार आहेत. त्यामुळे पवार नसतील तर आमच्या असण्यालाही अर्थ उरणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी कार्यक्रमातच दिली असल्याचं त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, माझी शरद पवारांसोबत या विषयावर वारंवार चर्चा सुरु आहे. कार्यकर्त्यांचा आणि माझा शरद पवारांना लवकरच निर्णय मागे घेण्याचा आग्रह असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवारांनी नेहमी पक्षाचा निर्णय मान्य केला आहे, यावेळीही ते मान्य करतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube