Download App

शरद पवारांच्या नेत्याने 25 लाख मागितले, ब्लॅकमेल केलं; यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप, ‘मविआ’त खळबळ

  • Written By: Last Updated:

Yashomati Thakur Allegation On Sunil Varhade Demanded 25 Lakhs : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आले आहेत. दरम्यान अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आलीय. काँग्रेस आमदार आणि तिवसा मतदारसंघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेत्यावर गंभीर आरोप केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत ऐन मतदानाची वेळ आली असतानाच मोठा गोंधळ उडाला आहे.

कॉंग्रेस नेत्या अन् तिवसा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुनील वऱ्हाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील वऱ्हाडे माझ्याकडे 25 लाख रूपये मागत असून ब्लॅकमेल करत आहेत, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. परंतु हे सर्व आरोप सुनील वऱ्हाडे (Sunil Varhade) यांनी फेटाळून लावले आहेत.

नाव बदलून मिळवली प्रसिद्धी! तुम्हाला ‘या’ फिल्म स्टार्सची खरी नावं माहित आहेत का?

यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?

यशोमती ठाकूर शरद पवार यांच्या गटाचे नेते सुनील वऱ्हाडे यांच्यावर आरोप करताना म्हणाल्या की, “यापूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना निवडून आणलं. त्यावेळी त्यांनी पैशांची मदत मागितली होती, ती सुद्धा केली. आता काल-परवा त्यांनी (सुनील वऱ्हाडे) मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे 25 लाख रुपयांची मागणी देखील केलीय. ते व्यापारी प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे नेहमीच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी केलीय.

तिवसा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार, यशोमती ठाकूर यांचे आश्वासन

आरोपांवर सुनील वऱ्हाडे यांचे प्रत्युत्तर

यशोमती ठाकूर यांच्या या गंभीर आरोपावर आता शरद पवार गटाचे नेते सुनील वऱ्हाडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सुनील वऱ्हाडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पलटवार करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, मी माझ्या घरी बसलेलो आहे. पक्षाबरोबर कुठेच गडबड केलेली नाही. मी पक्षाशी निष्ठावंत आहे. त्यांनी (यशोमती ठाकूर) चालवलेला हा चिल्लरपणा त्यांच्या फायद्याचा आहे का तोट्याचा? हे त्यांनींच ठरवावं असं देखील वऱ्हाडे म्हणाले आहेत.

 

follow us