Download App

मला नाही वाटत अजित पवार असं पाऊल उचलतील, परंतु…

  • Written By: Last Updated:

Yashomati Thakur On Ajit Pawar : सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग तसेच ईडीचा दुरुपयोग केंद्र सरकार करत आहे. या सर्व यंत्रणाच यावर करून इतर पक्षावर दबाव आणून केंद्र सरकार स्वतःचा पक्ष वाढवत आहे. त्यामुळे ते जरी अजित पवार यांच्यावर दबाव आणत असतील परंतु मला नाही वाटत अजित पवार असं करतील. परंतु कालचे स्टेटमेंट बघता राज्यात असं काही झालं तर राज्यातील राजकारण आणखी खालच्या दर्जाला जाईल. वज्रमूठ सभेच्या आगोदर हे ईडी सरकार मुदामून असा गोंधळ घालतात. महाविकास आघाडी अस्थिर व्हावी म्हणून हे प्रयत्न करत आहेत. अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या सरकारने नाफेडची खरेदी बंद केली त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कालच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी या सरकारने 15 कोटी रुपये खर्च करून लोकांचा जीव घेतला. आणि शेतकऱ्यांना अडचणीत टाकले जर तेच 15 कोटी शेतकऱ्यांना दिले असते तर शेतकरी वाचला असता. भाजप राज्यामध्ये अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत आहे. परंतु येत्या निवडणुकात राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा नक्की दाखवेल असे यावेळी ठाकूर म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार? शरद पवारांशी बोलून पक्षांतर करणार

पुलवामा हल्ल्याबाबत बोलताना ठाकूर म्हणतात केंद्र सरकारची निर्लज पणाची एक हद आहे. देशाच्या जवानांच्या रक्ताचे राजकारण हे करत आहेत. जर हे बाहेरच्या देशात झालं असत तर जवानांच्या रक्ताचं राजकारण करणाऱ्यांना फाशीवर दिल असत. परंतु आपल्या देशात हे होऊ शकत नाही. कारण या देशात हुकूमशाही आहे. जर आपण आज हे सर्व थांबलं नाही तर उद्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही.

Tags

follow us