Pune Metro News: ट्रॅफिकच्या वाढत्या समस्येवर पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बुधवारी (२५) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या (Pune Metro) दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी ३६२६ कोटी रुपये मंजुर करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सांगितलं.
पशुधन दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्या गोशाळा रडारवर; जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे कारवाई आदेश
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. या दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरी विषयी बोलताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे आज देशातील मोठं शहर म्हणून उदयाला आलं. इथं शिक्षण हब, संशोधन हब, अनेक चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळं पुणे मेट्रोचा सातत्याने विस्तार करण्याचा प्रयत्न केला जातो. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला आज ३६२६ कोटींची मंजुरी देण्यात आली. हा दुसरा टप्पा सध्याच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचा विस्तार असेल.
वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर-२अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर-ब) हा विद्यमान टप्पा-१ चा विस्तार म्हणून मान्यता मंत्रिमंडळाने दिली. मंजुरी मिळालेल्या या १२.७५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गावर 13 स्थानक असतील. जी बावधन, कोथरूड, खराडी, वाघोली सारख्या महत्त्वाच्या भागांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प आयटी हब, शैक्षणिक संस्था, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातील लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासासाठी चांगला पर्याय आहे,असंही वैष्णव म्हणाले.
दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये
नवीन मेट्रो मार्गांच्या माध्यमातून वनाज-रामवाडी मार्गाचे विस्तारीकरण होणार
मंजूर १२.७५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गावर १३ स्थानके असणार
चांदणी चौक आणि वाघोली येथे इंटरसिटी बस सेवा मेट्रोशी जोडली जाणार.
सध्या लाईन 1 या स्वारगेट ते कात्रजपर्यंतचे काम तेजीने चालू आहे. तर लाईन 1 च्या नॉर्थ विस्तारासाठी 4.4 किलोमीटरची मंजुरी देण्यात आलंचंही वैष्णव म्हणालेत.
११ वर्षापासून देशात मेट्रोचा विस्तार होतोय. २०१४ च्या आधी देशातील ५ शहरात मेट्रो होती, तर आजघडील २४ शहरात मेट्रो आहे. २०१४ साली मेट्रो नेटवर्क २४८ किलोमीटर होतं. आज मेट्रोचं नेटवर्क १ हजार ३६ किलोमीटर आहे, असंही वैष्णव म्हणाले.
दरम्यान, मेट्रोच्या विस्तारामुळे पु्ण्यातील मुख्य रस्त्यांवरील जसे की, पौड रोड आणि नगर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.