पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशनचं काम पूर्ण; 1 तारखेला PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशनचं काम पूर्ण; 1 तारखेला PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

Civil Court Interchange Station : पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट इंटरचेंज स्टेशनचे (Civil Court Interchange Station of Pune Metro) काम पूर्ण झालं असून या स्टेशनमधील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील स्थानक भूमिगत (अंडरग्राऊंड) असणार आहे. तर वनाज ते रामवाडी मार्गावरील स्थानक ओव्हरहेड म्हणजेच जमिनीवर असणार आहे. इंटरचेंज स्थानकांवर तसेच मेट्रोच्या विस्तारित मार्गावरील चाचणी पूर्ण झाली आहे. १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते गरवारे कॉलेज ते रुबी हॉस्पिटल आणि फुगेवाडी ते सिविल कोर्ट या विस्तारित मार्गाचं उद्घाटन होणार आहे. (Civil Court Interchange Station of Pune Metro completed Inauguration by PM Modi)

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनची खोली 33.1 मीटर (108.59 फूट) आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन बनले आहे. या भूमिगत स्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फुट उंच असून येथे थेट सूर्यप्रकाश वा नैसर्गिक प्रकाश पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली असून असे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्टेशनआहे.

पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी असा तिसरा मेट्रो मार्ग या स्थानकाला पादचारी पुलाने जोडला जाणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन हे मेट्रोचं मध्यवर्ती स्टेशन म्हणून नावारुपाला येईल. या स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्केलेटर प्रवाशांसाठी बसवण्यात आले आहेत.

2024 T20 विश्वचषकात आयर्लंडने आपले स्थान केले निश्चित 

पुणे मेट्रोच्या PCMC ते स्वारगेट (17 किमी) आणि वनाज ते रामवाडी (16 किमी) असे दोन मार्ग आहेत. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर दोन्ही मार्गिका एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन हे महत्त्वाचे स्टेशन म्हणून उभारण्यात येत आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनमध्ये PCMC ते स्वारगेट मार्गावर एक भूमिगत स्टेशन आणि वनाज ते रामवाडी मार्गावर एक उन्नत स्टेशन आहे. भूमिगत स्थानक एस्केलेटर आणि लिफ्टद्वारे उन्नत स्थानकाशी जोडलेले आहे.

सिव्हिल इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे एकूण क्षेत्रफळ 11.17 एकर असून या स्थानकावर वाहतुकीसाठी एकूण 7 गेट बसवले जाणार आहेत. या स्थानकात मोठ्या वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ‘ड्रॉप अँड गो’साठी एक खास लेन असेल. मल्टी मोडल इंटिग्रेशन साठी पीएमपीएमएल चा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लँडस्केप अत्यंत आकर्षक असे करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजी, विविध झाडे, हरित पट्टे, आकर्षक झाडी मोठ्याप्रमाणावर लावण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube