मी खासदार नाही तर शिवरायांचा मावळा…हाती झाडू घेत नीलेश लंकेंनी केली स्वच्छता

Nilesh Lanke: गड म्हणजे दगडांचा ढिगारा नाही, तर स्वराज्याचा आत्मा आहे. भविष्यातील पिढ्यांना इतिहास सुस्थितीत पोहोचावा.

A grand cleanliness initiative Sinhagad organized by MP Nilesh Lanke

A grand cleanliness initiative Sinhagad organized by MP Nilesh Lanke

अहिल्यानगर : पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad fort) ‘आपला गड, आपली जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार नीलेश लंके (MP Nilesh Lanke) यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “गड-किल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. मी खासदार म्हणून नव्हे, तर शिवरायांचा मावळा म्हणून या मोहिमेत सहभागी आहे,” असे खासदार लंके यांनी यावेळी सांगितले.(A grand cleanliness initiative Aapla Gad, Aapli jababjari, Sinhagad organized by MP Nilesh Lanke)


श्रेयवादाचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडतो, सत्यजीत तांबेंचे खताळांना आव्हान

रविवारी सकाळी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे समाधीस्थळावर जिजाऊ वंदना आणि संवर्धन प्रतिज्ञेनंतर मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर गडावरील 21 पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणांची स्वच्छता केली. कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, पुरुष बालेकिल्ला, राजाराम महाराज समाधी परिसर, तानाजी मालुसरे समाधी परिसर अशा प्रमुख ठिकाणी प्लास्टिक, काच, कागद, काटेरी झुडपे, वाळलेले गवत काढण्यात आले. पायवाटा खुल्या करण्यात आल्या.


Pankaja Munde PA Anant Garje : पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीची आत्महत्या, मुंबईत जीवन संपवलं

या मोहिमेत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिताताई इंगळे , सुरेखाताई दमिष्टे , इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, पद्माकर लायगुडे, दीपक खिरीड, अनिकेत चव्हाण, वरीष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर , सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब इंगळे,‘आपला मावळा’ संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, यांसह नगर, सातारा, सांगली आणि पुण्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याच्या एका रविवारी विविध किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा राबवण्यात येत आहेत. शिवनेरी, रायरेश्वर, भुदरगड, धर्मवीर गड, तिकोना येथेही यापूर्वी अशीच मोहीम पार पडली आहे.

गड म्हणजे दगडांचा ढिगारा नाही, तर स्वराज्याचा आत्मा आहे. भविष्यातील पिढ्यांना इतिहास सुस्थितीत पोहोचावा, यासाठी आम्ही या मोहिमेचा संकल्प केला आहे, असे खासदार लंके यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या सिंहगडावर पार पडलेली ही मोहीम गडसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. शेकडो शिवभक्तांच्या सहभागामुळे ‘आपला गड आपली जबाबदारी’ हा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला.


खासदार लंके हातात झाडू घेऊन स्वच्छतेत सामील

मोहीमेत स्वतः खासदार नीलेश लंके यांनी झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली. किल्ल्यावरील प्रमुख परिसरात सौरदिवे, कचराकुंड्या, लोखंडी बाकडे आणि दिशादर्शक फलक उभारण्यात आले. पर्यटकांनी गडावर स्वच्छता राखावी, कचरा फेकू नये, अशी आवाहनपर पाट्याही लावण्यात आल्या.

Exit mobile version