Download App

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला मोगर्‍यांची आरस; भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

Bhausaheb Rangari Ganpati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची देशातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख आहे. या गणपतीला संकष्टी चतुर्थी

Image Credit: letsupp

Bhausaheb Rangari Ganpati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची (Bhausaheb Rangari Ganpati) देशातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख आहे. या गणपतीला संकष्टी चतुर्थी निमित्ताने (Sankashti Chaturthi) संपुर्ण गाभाऱ्याला मोगर्‍याच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच वासंतिक उटी व मोगरा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Punit Balan Group चा स्तुत्य उपक्रम; राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक

संपूर्ण वर्ष श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. तर यावेळी अक्षय तृतीयेनिनिमित्त ट्रस्टच्या वतीने आंब्याची आरस बाप्पाला सजाविण्यात आली होती. तर रविवारी (27 मे) रोजी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने मोगरा मोहत्सव साजरा करण्यात आला. तसेच मोगर्‍याच्या फुलांच्या माळा मंदिराच्या संपुर्ण गाभार्‍यात लावण्यात आल्या होत्या. भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

अक्षय तृतीयेनिनिमित्त भारतीय बनावटीच्या पहिल्या आण्विक पाणबुडी प्रकल्पाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल डीएसपी वर्मा यांच्या हस्ते बप्पाची आरती करण्यात आली. यावेळी व्हाईस अ‍ॅडमिरल डीएसपी वर्मा म्हणाले, आज भारतीय युवा पिढीने भारतीय संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास करून त्यांची जपणूक करणे आवश्यक आहे. इथे आल्यानंतर एक नवीन ऊर्जा मिळाली तसेच येथील इतिहास जाणून घेताना मला आपल्या क्रांतिकारकांनी किती कष्ट घेतले याची जाणीव झाली असं व्हाईस अ‍ॅडमिरल डीएसपी वर्मा म्हणाले. 1892 मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली होती. गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी आहे. लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही.

रसिकांच्या भेटीसाठी पुन्हा येणार ‘गेला माधव कुणीकडे’! ‘या’ दिवशी होणार नाटकाचा शुभारंभ

इंग्रजांचा अन्याय मोडून काढून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे ध्येय होते त्याचेच प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत पाहायला मिळते.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज