Download App

रश्मी ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या कथित भेटीवर आदित्य ठाकरे म्हणाले…

Aditya Thackeray On Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील वेताळ टेकडीला भेट दिली त्यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या ठिकाणी चाललेल्या कामांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, वेताळ टेकडीवर जो काही बेताल विकास चाललेला आहे, किंवा विकासाच्या नावाखाली डिस्ट्रक्शन चालू आहे, ते थांबवण्याची गरज असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवले आहे. यावेळी रश्मी ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित भेटीवर बोलणं टाळलं आहे. अशी भेट झालीच नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांकडून अजितदादांची पाठराखण; म्हणाले त्यांच्याबाबत….

ठाकरे म्हणाले की, विकास करत असताना विकास हा शास्वत झाला पाहिजे. पुढची 50 ते 100 वर्ष हे कसं टीकू शकेल याचा विचार करायला पाहिजे. पर्यावरणासोबतच विकास कसा होऊ शकेल याचा विचार करणं गरजेचं आहे, आता झालं असं आहे की, साधारणपणे गेल्या सहा ते सात महिण्यांमध्ये अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली एकतर भ्रष्टाचार किंवा अनियमितता दिसून येत आहे. विकासाचा विचार न करता आणि स्थानिकांचा विचार न करता लाठीकाठीने असेल किंवा दमदाटीने विकास आणि विकासाच्या नावाखाली हे सर्व चाललेले प्रकार भयानक आहेत असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.


राज्यात विविध ठिकाणी सुरु होत असलेल्या प्रकल्पांमध्ये जनता विरुद्ध हुकूमशाही असं दिसत आहे. माझं एवढंच सांगणं असेल की, जे कोणी हे प्रकल्प असलेल्यांनी या ठिकाणच्या जनतेचं म्हणणं ऐकूणच पुढे पावलं टाकावीत असंही ते म्हणाले.

बारसूबद्दल प्रश्न केल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, नाणारमध्ये जेव्हा या प्रकल्पाला विरोध झाला त्यावेळी हा प्रकल्प आपण तेथून हलवला. त्यानंतर बारसूची जागा योग्य असू शकते असा विचार केला. जेव्हा त्यासाठी पत्र लिहिलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं सांगणं होतं की, जोकाही प्रकल्प आहे त्याचं जनतेसमोर प्रेझेंटेशन झालं पाहिजे. जनतेला जर प्रकल्प मान्य असेल तरच तिथं करु अन्यथा हा प्रकल्प इतर ठिकाणी हलवावा लागेल असंही ते म्हणाले.

आत्तापण भूमिका तीच आहे. कोणताही प्रकल्प असला तरी त्या ठिकाणी लाठीकाठी आपल्याच लोकांवर चालवून विकास होत नसतो. लोकांना बरोबर घेऊन, त्यांच्याशी बोलून इथं जे काही मी आलेलो आहे, नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन, पण लोकांचं ऐकायचंच नाही, ही जी काही भूमिका आहे, ती हुकूमशाहीची भूमिका असल्याचंही यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

Tags

follow us