शरद पवारांकडून अजितदादांची पाठराखण; म्हणाले त्यांच्याबाबत….

शरद पवारांकडून अजितदादांची पाठराखण; म्हणाले त्यांच्याबाबत….

Sharad Pawar On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी अचनाकपणे आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच हलकल्लोळ माजला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते.

त्यांच्या या निर्णयानंतर अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. राष्ट्रवदीचे नेते जयंत पाटील, नरहरी झिरवळ यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर दोन दिवसांनी त्यांनी काल आपला राजीनामा मागे घेण्याचे ठरवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमिटीने एकमताने त्यांच्या राजीनामा एकमताने नामंजूर केला असून त्यांनी शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रसेमधील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवारांच्या पुन्हा अध्यक्ष होण्याच्या निर्णयानंतर अजित पवार नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यावर आता शरद पवारांनी भाष्य केले आहे.

पवार म्हणाले, भाकर फिरवली पाहिजे मात्र त्यांनी निर्णय फिरवला…विखेंचा खोचक टोला

या सर्व घडामोडींनंतर शरद पवार हे आज बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांवर भाष्य केले आहे. काही लोकांच्या कामाच्या पद्धती वेगळी असतात. अजित पवार फार मिडीया फ्रेंडली नाही, ते फिल्डवर काम करतात. काही लोक वृत्तपत्रात नाव यावं म्हणून काम करणारे असतात, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे.

सद्गगुरू जग्गी शब्द मागे घ्या, महाराष्ट्राची माफी मागा; आव्हाडांनी सद्गुरूंना फटकारले

अजित पवार हातात काम घेतलं की ते पूर्ण करतात. अजित पवार राष्ट्रवादीसाठी चांगलं काम करत आहेत. अजित पवारांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अजित पवारांबाबत संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातंय, असे म्हणत त्यांनी अजितदादांची पाठराखण केली असून अजितदादांच्या नाराजीच्या चर्चांणा पूर्णविराम दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube