सद्गगुरू जग्गी शब्द मागे घ्या, महाराष्ट्राची माफी मागा; आव्हाडांनी सद्गुरूंना फटकारले

सद्गगुरू जग्गी शब्द मागे घ्या, महाराष्ट्राची माफी मागा; आव्हाडांनी सद्गुरूंना फटकारले

Jitendra Awhad on Sadguru Jaggi : सद्गगुरू जग्गी वासुदेव (Sadguru Jaggi Wasudev) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केला आहे. जग्गी यांनी अध्यात्मापर्यंतच मर्यादित रहावं. त्यांनी आता आपले शब्द मागे घ्यावेत आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत जग्गी वासुदेव यांच्यावर कठोर शब्दांत टीका केला.

जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत खोटी कथा सांगितली. त्यावरून आव्हाड यांनी जग्गी वासुदेव यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, इतिहासाचे विकृतीकरण हा महाराष्ट्राला आणि देशाला लागलेला शाप आहे. आता कुठे इतिहास व्यवस्थित सरळ मार्गाने जात असताना इतक्या मोठ्या आध्यात्मिक गुरूने असं काही बोलणं मनाला पटणारं नाही.

Nitesh Rane : सर्वात मोठा दलाल आज बारसूमध्ये आलाय, राणे बंधूंची उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी

त्यांना मी आता फक्त सूचना देत आहे. आपण जे बोललात ते चुकीचे आहे. इतिहासाच्या पुस्तकात कुठेही नाही. त्यामुळे त्यांनी आता जास्त पुढे न जाता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

दरम्यान, जग्गी वासुदेव यांना सर्व लोक सदगुरु या नावाने ओळखतात. ईशा फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत. सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या भाषणांमुळे ते कायम चर्चेत राहत असतात. आता त्यांच्यावर आव्हाड यांनी टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube