Video : अजित पवारांच्या जाण्याने अनेक समीकरणं बदलणार! पक्षाचं नेतृत्व कुणाकडं जाणार?, खास स्टोरी

राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमत्री, राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनाने आता अनेक समीकरणं बदलले आहेत. त्यावरचा हा खास रिपोर्ट.

News Photo   2026 01 29T152045.127

अजित पवारांच्या निधनाने अनेक समीकरणं बदलणार! पक्षाचं नेतृत्व कुणाकडं जाणार?, वाचा खास रिपोर्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं बारामती येथे काल बुधवार (दि. 28 जानेवारी)रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवाने निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पवार कुटुंब दु:खात बुडाल्याचं दिसलं. त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नेते कार्यकर्ते आणि सामान्य जनता बारामतीत आपल्या दादाला शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते. दरम्यान, आता अजित पवार यांच्यासारखा मोठा नेता गेल्यानंतर त्यांच्या पक्षाचं आणि त्यांच्याकडील पदांचं काय होणार अशी चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

अर्थखात्याचं काय होईल?

काही दिवसांनीच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडं होत. ते पद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:कडं ठेवतील असा अंदाज कुटे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे अजित पवार यांच्या राजकीय वारसदाराचा. यामध्ये अजित पवार यांचे दोन पुत्र आहेत. पार्थ पवार आणि जय पवार. परंतु, या दोघांकडेही राजकीय अनुभव नाही. त्यामुळे ते लगेच वारसदार होतील किंवा त्यांची तशी इच्छा असेल असंही नाही. राजकारण हे कठोर असतं. नियती जशी कठोर असते तसा एक राज्याचा गाडा आणि पक्षाचा गाडा हाकावा लागतो, आता दोन्ही पक्षाचे लोक बसतील. पक्षाच्या विलीनीकरणावर चर्चा होईल. परंतु, हे विलीनीकरण होईल का आणि अजित पवार यांच्या पक्षातील लोकांना ते मान्य होईल का? असाही प्रश्न आहे.

ही होती अजित दादांची शेवटची इच्छा; जयंत पाटलांकडून आठवणींना उजाळा

विलीनीकरण होईल का?

या पक्षाचे संस्थापक, पक्षाचे आधारस्तंभ शरद पवार यांची तब्येत तितकी बरी नाही. त्यांना पक्षाचा रोजचा कारभार हाकणं, संपर्क ठेवण हे शक्य होत नाही. सध्या जी पक्षातील मंडळी आहे, सत्तेत बसलेली आहे त्यांनाही शरद पवार यांच्यासोबत जावं की नाही असा संभ्रम असेल. कारण, शरद पवार जर म्हणाले मी भाजपसोबत जाणार नाही, सत्तेसोबत जाणार नाही असं जर म्हणाले तर सत्तेतील त्यांचं स्थान लगेच संपेल. त्यामुळे हे लोक विलीनीकरणाला फारसे अनुकुल नसतील, ते वेगळा विचार करतील. वेगळा पक्ष कसा अबाधीत राहील याचा विचार करतील. भाजपसोबतची सत्ता कायम कशी राहील यावर त्यांचा भर असेल.

पक्षाची सुत्र कुणाकडं जातील?

यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल. यामध्ये जे जाणवत आहे ते म्हणजे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. छगन भुजबळ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे हेही याला मान्यता देतील. इतर कोणी अध्यक्ष होण्यापेक्षा सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्या तर पक्ष एकजूट राहील, एकत्र राहील. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडं या पक्षाची सुत्र जातील. सुनिल तटकरे राज्यातील पक्षाची घडी बसवण्याचा प्रयत्न करतील. भाजपलाही हेच हव असेल. सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांच्याकडं सुत्र जाण्यापेक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडं जाणं भाजपसाठीही चांगलं ठरणार आहे.

नगरसेवक आमदार काय करतील?

सर्वात महत्वाचं म्हणजे, पुढचं अडीच तीन वर्षाचं राजकारण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते कसं करणार? त्यांचा आधारस्तंभ हरपलेला आहे. पुणे आणि पंपरी चिंचवडमध्ये जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांनाही पक्षामध्ये कोणाच्या आधारावर सत्ताधाऱ्यांसोबत लढायचं भांडायचं असा प्रश्न पडलेला असेल. यातील बहुतांशी मंडळी भाजपसोबत जातील. भाजपलाही हेच हवं असेल. शेवटी सत्तेशिवाय या नेत्यांना आमदारांना, खासदारांना आपली विकास काम करता येणार नाहीत. तसंच, यातील अनेकांचा डीएनए सत्तेचाच आहे. यातील अनेक मंडळी भाजपशी जवळीक साधतील.

दोन्ही पक्ष स्वतंत्र राहतील का?

काही दिवस तरी राष्ट्रवादीचं अस्तित स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता हा पक्ष स्वतंत्र ठेवाचा की काही मंडळी भाजपमध्ये जातील हे काही महिन्यांत कळेल. पुढच्या काही काळामध्ये राष्ट्रवादीचं अस्थित्व स्वतंत्र राहीलं. जसं भाजप धोरण बदलेलं तर काही मंडळी भाजपमध्ये जातील, तर ज्यांना भाजपच्या विरोधात राजकारण करायचं आहे ते शरद पवारांसोबत जातील. आता यामध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार काय करणार हा प्रश्न आहे? ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जातील असं वाटत नाही. पुढचे काही दिवस दोन्ही राष्ट्रवादीचं अस्तित्व स्वतंत्र राहील.

भाजपची भूमिका का महत्वाची

भाजप ठऱवेल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं पक्षाचं काय करायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा अजित पवारांशी स्नेह होता. तो त्यांनी दाखवलेलाही आहे. सुनेत्रा पवार यांना आधार देण, सुनेत्रा पवार यांच्या साथीने त्यांच्या पक्षाला बळ देणं हे काम प्राथमिक पातळीवर भाजप करेल. त्यानंतर त्याबबातची भूमिका ठरवली जाईल. आता सुनेत्रा पवार यांच्यासोबत यायचं की नाही असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नेत्यांचा असू शकेल. शेवटी पवार कुटुंब याबाबत काहीतरी ठोस निर्णय कितपत घेईल याबाबत शंका आहे. कारण अजित पवार यांच्या आमदारांना सत्ता सोडायची नाही हाही विचार करावा लागेल. त्यामुळे पुढचं राजकारण भाजपच्या कलाने होईल यामध्ये शंका नाही असंही शेवटी संपादक कुटे यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

Exit mobile version