अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला; काय होते कॅप्टन शांभवीचे शेवटचे शब्द?

अवघ्या 24 तासांत तपास पथकाने अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून काढला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.

  • Written By: Published:
Untitled Design (337)

Black box from Ajit Pawar’s plane crash found : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताच्या तपासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर अवघ्या 24 तासांत तपास पथकाने अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून काढला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, यामुळे अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिल्लीस्थित व्हीएसआर एव्हिएशन कंपनीच्या ‘लर्नजेट 45’ या विमानाचा ब्लॅक बॉक्स घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. डीजीसीए (DGCA) आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या संयुक्त पथकाने अपघातस्थळाची सखोल तपासणी केली. विमानाचे इंजिन, पंखे, कॉकपिटचा भाग आणि इतर अवशेषांचे नमुने गोळा करून त्यांची वैज्ञानिक चाचणीसाठी नोंद करण्यात आली आहे.

 

ब्लॅक बॉक्समधील डेटा आता विशेष प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार असून, तांत्रिक बिघाड झाला होता की मानवी चूक कारणीभूत ठरली? याबाबतचे ठोस निष्कर्ष या विश्लेषणानंतर समोर येणार आहेत. दरम्यान, अपघाताच्या क्षणी कॅप्टन शांभवी पाठक यांनी “ओह शिट!” असे शब्द उच्चारल्याची चर्चा आहे. मात्र, या कथित शेवटच्या शब्दांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) च्या अंतिम तपासणीनंतरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

विमान आता लँडिंग होणार आहे तुम्ही आलात का?; शेवटचा फोन आणि अंगरक्षकाच्या डोळ्यासमोरच कोसळले विमान

एएआयबी (AAIB) अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे आता अपघाताच्या घटनांचा अचूक क्रम समजणे शक्य होणार आहे. विमानाची उंची, हवेचा वेग, तांत्रिक प्रणालींची स्थिती, तसेच पायलटच्या शेवटच्या हालचाली, या सर्व बाबींची सविस्तर माहिती विश्लेषणातून समोर येणार आहे. या तपासातूनच बारामती विमान अपघातामागील सत्य नेमके काय आहे, हे स्पष्ट होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता या अहवालाकडे लागले आहे.

follow us