Download App

‘बारामतीचा निकाल शून्य टक्के’; भर भाषणात अजित पवारांनी टोचले शिक्षकांचे कान…

Ajit Pawar On baramati Teachers : पुण्यामध्ये आज शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्याचवेळी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. त्यात सर्वाधिक शिरुर तालुक्यातील विद्यार्थी आहेत तर बारामती तालुक्यातील एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकला नाही, यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील शिक्षकांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी अजितदादांनी इंग्रजी शिकवण्याकडे लक्ष देण्याचा सल्ला शिक्षकांना दिला.

Dhangar reservation : विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणातील त्रुटी दूर करून समाजाला न्याय द्यावा; राम शिंदेंची मागणी

अजित पवार म्हणाले की, आठवीचे एकूण 83 विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले आहेत. त्यात सर्वाधिक 83 पैकी 42 विद्यार्थी हे शिरुर तालुक्यातील आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अजितदादांनी तोंडभरुन कौतुक केले. दुसरा क्रमांक आंबेगाव तालुक्याचा त्यांचे 15 विद्यार्थी गुणवत्ताधारक बनले आहेत.

राजकारण तापलं! विखेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 51 हजारांचं बक्षीस; मल्हार सेना आक्रमक

तिसरा क्रमांक खेड तालुक्याचा 14 विद्यार्थी, चौथा क्रमांक मुळशी तालुका 5 विद्यार्थी, मावळ तालुका 4 आणि वेल्हे तालुक्याचे 3 विद्यार्थी असे मिळून 83 विद्यार्थी गुणवत्ताधारक बनले आहेत.आणि शून्य निकाल कुठला लागला तर बारामती तालुक्याचा. त्यावरुन अजित पवार म्हणाले की, आता काय कपाळ फोडावं का?

आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून मरमर काम करतो. शिरुरचे माझे शिक्षक, शिक्षिका यश मिळवू शकतो, आंबेगावचा मिळवू शकतो, खेडचा मिळवू शकतो पण आम्ही शून्य असं म्हणत अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिक्षकांवर नाराजी व्यक्त केली.

बारामतीबरोबरच भोर, दौड, हवेली शून्य टक्के निकाल लागला त्यावरुनही शिक्षकांवर नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी हवेलीत बदल्या मागण्यावरुन शिक्षकांना टोला लगावला. हवेलीमध्ये तर सर्वच शिक्षकांना बदल्या पाहिजे असतात. दादा हवेली द्या, पु्ण्याच्या जवळ द्या, तो तुमचा अधिकार आहे असं म्हणत बदलीच्या विषयावर पुढे बोलणं टाळलं.

त्याचबरोबर हवेली, इंदापूर, जुन्नर आणि पुरंदरचाही शून्य टक्के निकाल लागला ही बाब काही समाधानकारक नाही. आज सर्वात जास्त खर्च शिक्षण विभागावर करत आहोत. आणि अशा प्रकारचा निकाल येणं योग्य नाही असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Tags

follow us