Dhangar reservation : विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणातील त्रुटी दूर करून समाजाला न्याय द्यावा; राम शिंदेंची मागणी
अहमदनगर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच धनगर समाजही (Dhangar reservation) आरक्षणाची मागणी करू लागला. धनगर समाजाचे जामखेडमध्ये उपोषण सुरू झाले. धनगर समाजाला घटनेतील आरक्षण मिळावे, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी उपोषणकर्त्यांची भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी भेट घेतली. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणातील त्रुटी दूर करून धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी चौंडी येथे बोलताना केली.
गेल्या दहा-अकरा दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. अशातच आता धनगर समाजही आरक्षणाची मागणी करू लागला. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेने चौंडी (ता. जामखेड) येथे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, आज सकाळी आमदार प्रा. राम शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्ते माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, यशवंत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव दांडगे पाटील, अण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितीन धायगुडे यांची भेट घेतली.
दिल्लीत G20 परिषद; वाराणसी विमानतळ उडवून देण्याची धमकी
यावेळी बोलतांना राम शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला घटनेतील आरक्षण मिळावं ही धनगर समाजाची आहे. या मागणासाठी गेल्या 70 वर्षापासून धनगस समाज लढत आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाला केवळ आश्वासने दिली जात आहेत. मात्र, समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. आरक्षण धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे. या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी यावेळी बोलताना केली.
ते म्हणाले, धनगर समाजाला घटनेतील आरक्षण तातडीने लागू करावं, संसदेच्या विशेष अधिवेसनता हा विषय मार्गी लावावा.
धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणातील त्रुटी दूर करून धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.
यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर अंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या.