G20 summit: वाराणसी विमानतळ उडवून देण्याची धमकी, आरोपीला अटक

G20 summit: वाराणसी विमानतळ उडवून देण्याची धमकी, आरोपीला अटक

Varanasi International Airport : देशाची राजधानी दिल्लीत सध्या G20 शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. दरम्यान, राजधानीपासून सुमारे 850 किमी अंतरावर असलेल्या वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अनोळखी क्रमांकावरून विमानतळ अधिकाऱ्याला फोन आला होता. या धमकीने वाराणासी परिसरात भीती निर्माण झाली होती.

धमकी मिळाल्यानंतर, सीआयएसएफने तातडीने विमानतळाच्या प्रत्येक कोपऱ्याची सखोल तपासणी सुरू केली आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधित फुलपूर पोलीस ठाण्याला धमकीच्या कॉलची माहिती दिली. यानंतर कॉल ट्रेस करत पोलिसांनी भदोही गाठले आणि एका आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाराणसी विमानतळावर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. आज संध्याकाळपर्यंत विमानतळाचा नकाशा बदलला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. एवढेच नाही तर फोन करणाऱ्याने आपले नाव अशोक असल्याचे सांगितले होते. आरोपीला धमकी दिल्यानंतर त्याने फोन कट केला. हा धमकीचा फोन शुक्रवारी संध्याकाळी केल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळ अधिकाऱ्याने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यानंतर सीआयएसएफने संपूर्ण विमानतळाची सखोल चौकशी सुरू केली.

Jawan: किंग खानच्या जवानमधील सुमित अरोराच्या संवादाने घातली प्रेक्षकांना भुरळ!

स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर कॉल ट्रेस करत भदोही परिसरातून कॉल केल्याचे निष्पन्न झाले. त्या ठिकाणाचा माग काढत वाराणसी पोलीस भदोही येथे पोहोचले. लोकेशन शोधत असताना फुलपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक कुमार भगवानपूर चौथर परिसरात पोहोचले. त्यानंतर हा फोन अशोक प्रजापती (वय- 25) याच्या घरातून केल्याचे तपासातून उघड झाले.

G20 Summit मधील परदेशी पाहुण्यांसोबतच्या मोदींच्या काही खास क्षणचित्रांवर नजर टाकूया…

पोलिसांनी अशोक प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे. फुलपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी दीपक कुमार राणावत यांनी सांगितले की, अशोकच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अशोकवर एप्रिल 2023 पासून वाराणसीतील मनोचिकित्सकाकडे उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यानही अशोकने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सध्या अशोकच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube