Ajit Pawar and Sharad Pawar together in VSI General meeting possibility of coming CM Fadanvis : सध्या राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. (Pune) अशातच राज्याच्या राजकारणातून रविवारी 28 डिसेंबर रोजी मोठी बातमी समोर आली. पिंपरी– चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील पवार काका-पुतणे (Sharad Pawar) एकत्र येताना दिसणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
पवार काका-पुतणे दुसऱ्या दिवशीही एकत्र!
दरम्यान नियोजित कार्यक्रमांप्रमाणे पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टीस्ट्युटची सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. त्यात नुकतेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार हे काका-पुतणे आज पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याला अनेकांकडून युतीच्या पार्श्वभूमीवर पवारांकडून केली जाणारी साखर पेरणी मानली जात आहे.
‘या’ 5 राशींना सुख म्हणजे नक्की काय असतं! असा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य…
त्यात या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांची उत्कंठा वाढली आहे. पिंपरी चिंडवडसह पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर पवारांचं एकत्र येणं आणि त्यात फडणवीस देखील असणं राज्याच्या राजकारणामध्ये नव्या घडामोडी घडणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
मोठी बातमी! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये थेट घोषणा
दुसरीकडे रविवारी बारामतीमध्ये उद्योजक गौतम अदानी यांच्या हस्ते शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टीफिशिअल इंटेलिजन्स या इमारचं उद्धाटन झालं. त्यावेळी देखील अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
