Download App

Ajit Pawar : नाट्य संमेलनाचं निमंत्रण नाही म्हणत अजितदादांनी पवारांसोबत एकत्र येणं टाळलं?

Ajit Pawar : उद्घाटन नाही, पडद्याचा काहीतरी कार्यक्रम आहे. तर निमंत्रण पत्रिकेवर आपले नाव आहे. मात्र माझं नाव कुठेही टाकतात. पण शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याचा अजित पवार (Ajit Pawar ) यांनी दावा केला. आज (5 जानेवारी) सकाळी माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता की, आज शंभराव्या नाट्य संमेलनाचा उद्घाटन आहे तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार का? त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.

ससून रूग्णालयात मोठा राडा; भाजप आमदाराकडून अजितदादांच्या आमदाराला मारहाण

मात्र पुण्यामध्ये होत असलेल्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून वेगळच राजकारण रंगलं आहे. या मराठी संमेलनाचं निमंत्रण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही देण्यात आलं होतं. या दोघांचेही नाव या निमंत्रण पत्रिकेवर आहे. मात्र या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. कोणीही निमंत्रण पत्रिकेवरती आपलं नाव टाकतं. असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे दुसरीकडे नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचा निमंत्रण नाही म्हणत, अजित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत एका व्यासपीठावर येणं टाळलं असल्याचे देखील बोलले जात आहे.

Ship Hijacked: सोमालिया किनारपट्टीवर मालवाहू जहाज हायजॅक, क्रुमध्ये 15 भारतीयांचं अपहरण

दुसरीकडे या संमेलनाच्या आयोजकांनी देखील अजित पवारांनी उद्घाटनाचं निमंत्रण नसल्याचं म्हटल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना शंभरावे नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा निमंत्रण आहे. मी स्वतः त्यांना त्यांना निमंत्रण दिले आहे. शरद पवार यांना देखील निमंत्रण दिलेले आहे. त्याचबरोबर स्वतः मंत्री उदय सामंत आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले हे देखील या संदर्भात त्यांच्या दोघांशी बोलले आहेत. अशी माहिती संमेलनाच्या आयोजकांनी दिली मात्र अजित पवार यांनी अशा प्रकारचे कोणतेही निमंत्रण नसल्याचा म्हटलं आहे.

रामायण मालिकेतल्या सीतेची पंतप्रधान मोदींना विनंती; म्हणाल्या, “अयोध्येच्या मंदिरात प्रभू …”,

यादरम्यान जाहीर व्यासपीठावर जरी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत एकत्र येणं टाळलं असलं. तरी देखील राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन करणारे अजित पवार यांच्या बंडानंतर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अनेकदा गुप्त भेटी झाल्याचे देखील समोर आले होते.

follow us

वेब स्टोरीज