Ship Hijacked: सोमालिया किनारपट्टीवर मालवाहू जहाज हायजॅक, क्रुमध्ये 15 भारतीयांचं अपहरण
Ship Hijacked : सोमालियाच्या किनारपट्टीवर एक मालवाहू जहाज हायजॅक (Ship Hijacked) करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी हे जहाज हायजॅक करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. एमव्ही लीला नॉरफोल्क असं या जहाजाचं नाव आहे. ज्यामध्ये पंधरा भारतीय क्रु मेंबर्स आहेत. हे जहाज ब्राझीलच्या पोर्टो डू एकू या ठिकाणाहून बहारीनमधील खलिफा बिन सलमान या बंदराकडे जात होतं. या जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावण्यात आला आहे.
रामायण मालिकेतल्या सीतेची पंतप्रधान मोदींना विनंती; म्हणाल्या, “अयोध्येच्या मंदिरात प्रभू …”,
11 जानेवारीला हे जहाज निश्चित स्थळी पोहोचणे अपेक्षित होतं. मात्र 30 डिसेंबरपासून या जहाजावरील लोकांशी संवाद झालेला नाही. त्यानंतर गुरुवारी हे जहाज हायजॅक झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे भारतीय नौदलाकडून त्या जहाजावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून जहाजावरील क्रु मेंबरशी संवाद झाल्याचे देखील लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
Chhagan bhujbal: जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर काय म्हणाले भुजबळ?
याबद्दल माहिती देताना भारतीय नौदलाकडून सांगण्यात आलं आहे की, गुरुवारी (4 जानेवारी) संध्याकाळी लायबेरियाचा झेंडा असलेलं जहाज अरबी समुद्रातून जात होतं. या जहाजाने युकेएमटीओ या पोर्टलवर एक संदेश पाठवला. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, पाच ते सहा सशस्त्र अज्ञात लोक या जहाजावर चढले आहेत. त्यांच्याकडून जहाजाला हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Ajit Pawar : नाट्य संमेलनाचं निमंत्रण नाही म्हणत अजितदादांनी पवारांसोबत एकत्र येणं टाळलं?
हा संदेश मिळताच भारतीय नौदलाने या जहाजाला वाचवण्यासाठी युद्ध जहाज आयएनएस चेन्नईला रवाना केलं. आयएनएस चेन्नई हे मेरीटाईम सिक्युरिटीसाठी अरबी समुद्रात तैनात आहे. त्याचबरोबर आज(5 जानेवारी) सकाळी नौदलाच्या एअरक्राफ्टने देखील या हायजॅक केलेल्या जहाजावरून भरारी घेतली. त्यावेळी जहाजातील क्रु मेंबरशी संवाद साधण्यात आला. त्याचबरोबर या मिशनमध्ये भारतासह इतर देशदेखील या जहाजाला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.
दरम्यान सध्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर अशाप्रकारे जहाजांवर होणारे हल्ले वाढले आहेत. सोमालिया हा आफ्रिकन देश आहे. या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर सोमालियाजवळ असल्याने समुद्री लुटेऱ्यांचा धोका जास्त आहे. मात्र अद्याप हे जहाज समुद्री लुटेऱ्यांनी हायजॅक केलं आहे की, दुसऱ्या एखाद्या संघटनेने हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान दुसरीकडे इस्राइल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरती जहाजावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढलं आहे.