अजित पवारांचा अपघात झालेलं विमान कोणतं?, लियरजेट-45 मॉडलच्या विमानांबद्दल मोठा खुलासा

जमिनीवरुन उंचावर जाईपर्यंत विमानाच स्पीड खूप जास्त असतो. हे चार्टर्ड विमान फक्त 18 ते 20 मिनिटात 41 हजार फूट उंचीवर पोहोचू शकतं.

News Photo   2026 01 28T161122.696

अजित पवारांचा अपघात झालेलं विमान कोणतं?, लियरजेट-45 मॉडलच्या विमानांबद्दल मोठा खुलासा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं. (Ajit Pawar) ते लियरजेट-45 मॉडलच्या चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. लँडिंगच्यावेळी अचानक विमानात बिघाड झाला. त्यानंतर विमान क्रॅश झालं. अपघाताशी संबंधित माहितीमध्ये हे सुद्धा समोर आलय की, लियरजेट-45 मॉडलच्या चार्टर्ड विमानांचे याआधीही अनेक अपघात झालेत.

जगभरात या श्रेणीच्या विमानांचे जवळपास 200 अपघात झालेत. वर्ष 2023 मध्ये मुंबईतही लियरजेट-45 विमानाला अपघात झाला होता. पण त्यावेळी कोणाचा मृत्यू झाला नव्हता. 1960 साली बिझनेसमॅन विलियम पॉवेल लियर यांनी लियरजेट प्रकारच्या विमान निर्मितीची सुरुवात केली. हे विमान Bombardier Aerospace (कॅनडा) च्या अधीन आहे. या क्लासची विमानं नेते आणि बिझनेसमनच्या विशेष पसंतीची असतात.

राजकारणाचा पूर्ण अंदाज अन् उत्तम पद्धतीने हाताळायचं कसब; राज ठाकरेंची अजित पवारांना श्रद्धांजली

अपघाताची संख्या पाहून 2021 साली कंपनीने या प्लेनच प्रोडक्शन बंद केलं होतं. विमानांचा मेंटेनेंस आणि सर्विसच काम अजूनही सुरु आहे. लियरजेट-45 श्रेणीतील चार्टर्ड विमानं जगभरात प्रसिद्ध आहेत. यात 6 ते 8 लोकांच्या बसण्याची क्षमता असते. लियरजेट 45 मॉडलचा टॉप स्पीड 860 किलोमीटर प्रतितास आहे. क्रूज स्पीडही इतकाच आहे. या विमानाची उड्डाणाची रेंज 1,900 ते 2,200 नॉटिकल मील म्हणजे जवळपास 3,500 ते 4,000 किलोमीटर आहे.

किती हजार फूट उंचीवरुन उड्डाण करण्याची क्षमता?

जमिनीवरुन उंचावर जाईपर्यंत विमानाच स्पीड खूप जास्त असतो. हे चार्टर्ड विमान फक्त 18 ते 20 मिनिटात 41 हजार फूट उंचीवर पोहोचू शकतं. विमानात वायफाय आणि सॅटलाइट फोनची सुविधा असते. हे विमान छोट्या रनवेवर लँडिंग आणि टेक ऑफसाठी परफेक्ट मानलं जातं.

कुठलं इंजिन वापरतात?

या विमानात कॅनडाच्या Pratt & Whitney कंपनीने बनवलेलं ट्विन टर्बोफॅन इंजिन आहे. इंधनाच्या दृष्टीने हे विमान फायदेशीर मानलं जातं. विमानात डिजिटल फ्लाइट कंट्रोल, चांगल्या नेविगेशन सिस्टिममुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे विमान चांगलं मानलं जातं.

कितीवेळा लँडिंगचा प्रयत्न?

अजित पवार मुंबईहून बारामतीला चाललेले. त्यांच्या पक्षाच्या आज तिथे चार सभा होत्या. रिपोर्टनुसार लँडिंग आधी बारामती एअरपोर्टजवळ हे प्लेन क्रॅश झालं. अजित पवार यांच्या विमानाने दोनवेळा लँडिंगचा प्रयत्न केला. पण बारामती एअरपोर्टवर विमानाला लँडिंग करता आलं नाही. या दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.

Exit mobile version