Download App

तुम्ही मला मतं दिली म्हणजे तुम्ही काय माझे….अजित पवार कार्यकर्त्यांवर का भडकले? काय घडलं?

एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचं

  • Written By: Last Updated:

DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बारामतीच्या दौऱ्यावर होते. (Ajit Pawar ) या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं.

तर धनंजय मुंडेही गुन्ह्यात येतील, ते काय ब्रह्मदेव नाहीत; सुरेश धस यांचा इशारा

नेमकं काय घडलं?

एका पेट्रोल पंपाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिले जात होते. त्यानंतर अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते. मात्र, याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचं म्हटलं. त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही तसंच म्हटलं. यानंतर अजित पवार हे काहीसे संतापले आणि म्हणाले, अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला.

मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया

काही वेळेला असं होतं की लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार देखील आपण काही तारतम्य न ठेवता थेट हे काम झालंच पाहिजे असा आग्रह करतात. त्यावेळेला एखाद्यावर रागावणं हे सहाजिक आहे. एखादा लोकप्रतिनिधी उलट बोलला तर त्याची बातमी होते. पण एखादा नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही. कदाचित अजित पवार यांनी रागाच्या भरात ते वक्तव्य केलं असावं, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

follow us