Download App

अजितदादांच्या चाणाक्ष नजेरचा प्रत्यय! हॉटेलच्या उद्घाटनाला गेले अन् अंगातला इंजिनिअर जागला…

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या चाणाक्ष नजरेचा प्रत्यय आला आहे. अजित पवार पुण्यातील एका हॉटेलच्या उद्घाटनाला गेले असता त्यांच्या अंगातला इंजिनिअर जागला आहे. रोखठोक स्वभाव, खरं अन् तिखट बोलणं, अंगी शिस्तप्रियता असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची ओळख आहे. रोखठोक बोलण्याने ते राजकारणात ओळखेल जातात. अशातच पुण्यातल्या भोर इथल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनासाठी पवार गेले असता त्यांनी हॉटेलची पाहणी केली.

राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

हॉटेलच्या रुम्सची पाहणी करीत असताना रुम्सच्या बाथरुमची जागा कमी असल्याचं अजितदादांच्या नजेरतून काही सुटलं नाही. कमी जागा असल्याचं लक्षात येताच अजितदादांनी हॉटेल मालकाला मिश्किल अंदाजात बाथरुमध्ये अंघोळ करण्यास सांगितलं आहे. अजितदादांच्या मिश्किल अंदाजामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं दिसून आलं.

कपाळावर टीळा, गळ्यात माळ; केदारनाथनंतर आता अक्षय कुमार बद्रीनाथच्या दर्शनाला, व्हिडिओ व्हायरल

भोरचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या ईफोटेल नावाच्या पंचतारांकित हॉटेलचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे इथं अजित पवारांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन झालं. त्यानंतर अजित पवार यांनी हॉटेलची पाहणी केली.

Niti Aayog Meeting: 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार

अजित पवार पाहणी करीत असतानाच त्यांना हॉटेलच्या रुम्सच्या बाथरुमची जागा कमी असल्याचं लक्षात आलं होतं. याचवेळी अजित पवार यांच्यातला इंजिनिअर जागा होत त्यांनी मिश्किलपणे हॉटेलच्या संचालकांना बाथरुममध्ये अंघोळ करण्याचं सांगितलं.

दरम्यान, अजित पवारांच्या या चाणाक्ष नजरेला आणि त्यांचं प्रत्येक गोष्टीत असणाऱ्या बारीक निरीक्षणाला उपस्थितांनी दाद दिली. त्यांच्यामध्ये असणाऱ्या अभ्यासूवृत्तीचा आणि मिश्किलपणाचा प्रत्यय पुन्हा भोरवासियांना आला.

Tags

follow us