Ajit Pawar : राज्यात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होण्याआधी राज्यपालांनी सात आमदारांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या घडामोडींनंतर पहिला धक्का अजित पवारांना बसला आहे. अजित पवारांसाठी धक्कादायक बातमी त्यांच्याच पुणे जिल्ह्यातून आली आहे. पुण्यात अजित पवार गटात नाराजीनाट्य सुरू झालं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले. मंगळवारी तब्बल 600 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
पुणेकरांसाठी गुड न्यूज : खडकवासला ते हडपसर अन् नळस्टॉप ते माणिकबाग मेट्रोने जाता येणार
मंगळवारी दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. ही घोषणा होण्याच्या अगोदर राज्यपालांनी विधानपरिषदेत सात आमदारांची नियुक्ती केली. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना शपथ दिली. या सात आमदारांत तीन भाजप, दोन शिंदे गट आणि दोन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांना संधी मिळाली. या यादीत अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचं नाव मात्र नव्हतं.
त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू झाले. मंगळवारी एकाच दिवसांत तब्बल 600 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरे हे पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर असे घडले तर अजित पवारांसाठी हा आणखी एक धक्का ठरू शकतो.
दीपक मानकर यांना संधी मिळाली नाही म्हणून कार्यकर्त्यांनी पुणे शहर कार्यालयात चांगलाच गोंधळ घातला आणि राजीनामा दिला. याआधी पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेत दीपक मानकर यांना आमदार करण्याची मागणी केली होती. मात्र तरीही दीपक मानकर यांचा विचार झाला नाही. पदाधिकाऱ्यांची मागणी डावलण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाची परिणिती राजीनामा देण्यात झाली.
12 न घेता 7 का घेतले हे कळायला मार्ग नाही राज्यपाल नियुक्त आमदारांवरून अजित पवारांचा प्रश्न
विधानपरिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित 12 जागांपैकी 7 जागांवर रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी दिली आहे. अजित पवारांच्या कोट्यातून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे.